प. पू. सद्गुरूनाथ श्रीकाका महाराज १९७५ सालापासून जनकल्याणाचे कार्य अविरत , अखंड करत आहेत. श्रीकाका महाराजांकडे मार्गदर्शनासाठी येणा-या लोकांना ईश्वरभक्तीची आवड लागावी यासाठी श्रीमहाराजांनी त्यांच्या स्वतःच्या राहत्या वास्तूतील परिसरात बांधलेल्या त्यांच्या सांईमंदिरात आरती , भजन , नामजप , विविध उत्सव आदि उपक्रम सुरु केले. तसेच , भक्तांनी नामसाधनेच्या मार्गानी खंबीर व आत्मनिर्भर होऊन जीवनात आनंदी व निर्भीड व्हावं यासाठी मंदिरात सत्संगाचा उपक्रमही सुरु केला. सत्संगाच्या माध्यमातून श्रीमहाराज सर्वांना तळमळीने मार्गदर्शन करत आहेत.
सत्संगाला येणा-या भक्तांच्या सुख-सुविधेसाठी , इ.स.२००८ ला श्रीकाका महाराजांनी त्यांच्या स्वतःच्या राहत्या वास्तूत ’मुरलीधर वास’ हे प्रशस्त सत्संगालय स्वखर्चाने बांधले. या गोष्टीची जाणीव होऊन , श्रीकाका महाराजांच्या भक्त मंडळींनी स्वयंस्फूर्तीने निधी जमविण्याचे ठरविले. सुमारे साडे-सहा लाख रुपयांचा निधी , फूल ना फुलाची पाकळी म्हणून प. पू. श्रीकाका महाराजांना देऊ केला. परंतु श्रीकाका महाराजांनी या निधीचा स्वीकार केला नाही. सर्व भक्तांनी जेव्हा खूप आग्रहच केला तेव्हा श्रीकाका महाराजांनी एक योजना आखली. त्यांनी सर्व भक्त मंडळींची एक सभा दि. १७ डिसेंबर २००८ रोजी घेतली. या सभेमध्ये , जमविलेल्या निधीचा गंगाजळी म्हणून वापर करून एक न्यास स्थापन करण्याची कल्पना श्रीकाका महाराजांनी सर्वांसमोर मांडली. या न्यासाच्या माध्यमातून श्रीकाका महाराजांच्या कार्याचा , त्यांच्या संजीवक विचारधारेचा प्रचार - प्रसार करणे , गरीब व वंचित लोकांना मदत करणे , गरजू लोकांसाठी वैद्यकीय सुविधा पुरवणे , होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करणे , जनजाग्रुती करणे इत्यादी समाजोपयोगी कार्ये करता येतील असा विचार श्रीकाका महाराजांनी मांडला. सर्वानुमते ही कल्पना मान्य होऊन , ’प. पू. सद्गुरूनाथ श्रीकाका महाराज ( श्री. श्रीपाद अनंत वैद्य ) सेवा परिवार’ या नावाने न्यास स्थापन करण्याचे ठरले. अशा रीतीने ही सेवाभावी संस्था उदयास आली.
प. पू. श्रीकाका महाराजांनी , भक्त मंडळींनी त्यांना अर्पण केलेल्या निधीचा विनीयोग , निस्प्रुहपणे न्यासनिर्माणासाठी केला. न्यासस्थापनेनंतर न्यासाच्या विश्वस्त मंडळावर , श्रीकाका महाराजांनी स्वतःला अथवा स्वतःच्या कुटंबातील व्यक्तींना नेमून घेतले नाही. संस्थेचा कार्यभार भक्तमंडळींकडेच सोपवला. संस्थेच्या आर्थिक व्यवहाराशी श्रीकाका महाराजांनी कोणताच संबंध ठेवलेला नाही. परंतु , सर्वांच्या विनंतीवरून गरज पडल्यास , बाहेरून विश्वस्त मंडळाला सल्ला व मार्गदर्शन करण्याचे काम श्रीकाका महाराज करत असतात. प. पू. श्रीकाका महाराजांच्या प्रेरणेने , मार्गदर्शनाने व आशीर्वादानेच संस्थेच्या कार्याची यशस्वी वाटचाल सुरु आहे.
प. पू. सद्गुरूनाथ श्रीकाका महाराज ( श्री. श्रीपाद अनंत वैद्य ) सेवा परिवार’ ही संस्था दि. ५ मे २००९ रोजी , संस्था नोंदणी अधिनियम १८६० अन्वये अधिक्रुत रित्या प्रमाणित करण्यात आली (संस्था नोंदणी क्र. महा – ४८२ २००९ पुणे ). तसेच ही संस्था सार्वजनिक संस्था (न्यास) म्हणून , सर्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० अन्वये दि. १७-०८-१००९ रोजी अधिक्रुत रित्या प्रमाणित करण्यात आली ( न्यास नोंदणी क्र. एफ – २४४७८ पुणे ). संस्थेचे एक बचत खाते राष्टíÐयीक्रुत बðकेत व दुसरे बचत खाते सहकारी बðकेत उघडण्यात आले आहे.
प. पू. सद्गुरूनाथ श्रीकाका महाराज ( श्री. श्रीपाद अनंत वैद्य ) सेवा परिवार’ या संस्थेची स्थापना , प. पू. श्रीकाका महाराजांचे विचार , त्यांची शिकवण व माहिती यांचा प्रसार व्हावा आणि त्याचबरोबर समाजातील गरजू लोकांना समाजसेवेच्या माध्यमातून आधार मिळावा या हेतूने केली आहे. या न्यासाचे संस्थापक सदस्य हे प. पू. श्रीकाका महाराजांचे भक्त / अनुयायी असून , ते सर्व ; प. पू. श्रीकाका महाराज करत असलेल्या लोककल्याणाच्या समान धाग्यानीच एकत्र आलेले आहेत.
न्यासाचे सर्व व्यवहार न्यास – घटनेच्या सर्व लागू नियमांनुसार चालतात. न्यासाचे संस्थेचे ज्ञांपन असे दर्शवते की , ज्या उद्दिष्टासाठी न्यासाची स्थापना केली आहे , ते उद्दिष्ट संपूर्णपणे उदात्त आहे. न्यासाचे प्रमुख ध्येय , प. पू. श्रीकाका महाराजांचे साहित्य , त्यांची शिकवण , त्यांचे विचार यांचा समाजात प्रचार व प्रसार करून आध्यात्मिक संदेश देणे हे आहे आणि त्याचबरोबर , गरीब व वंचितांना साहाय्य , होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत , स्त्री-कल्याण (पीडित महिलांच्या पुनर्वसनाच्या कार्यात मदत) , गरजूंना वैद्यकीय सुविधांची मदत , जनजाग्रुती इ. समाजकार्याचे उपक्रम राबवणे हे ही आहे.
प. पू. श्रीकाका महाराजांचे काही विचार ध्वनीमुद्रित केले असून , त्याच्या सी.डी. विविध देवालये , यात्रा व न्यासाने आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरांमधून लोकांना ऐकवल्या जातात. न्यासातर्फे आयोजित केल्या जाणा-या शिबिरांमध्ये सर्वसाधारण आरोग्य तपासणी , दंतचिकित्सा , रक्त तपासणी , नेत्र तपासणी , रक्तदान शिबिरं , अस्थमा तपासणी इ. तपासण्या विनामूल्य केल्या जातात व मोफत औषधांचे वाटपही करण्यात येते. विविध शाळा व वसतीग्रुहांमध्ये प्रति महिना धान्य व भाजीपाल्याची मदत पुरवली जाते. या बरोबरच विभिन्न जीवनावश्यक वस्तूंची मदतही केली जाते. गरीब वस्त्यांमधून कपडे तसेच जीवनावश्यक भांडी वगैरे वस्तूंचे वाटप , गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत पुरविली जाते. त्याचबरोबर , वसतीग्रुहांमधून संगणक , इनव्हर्टर , अद्ययावत विज्ञान प्रयोगशाळा संच , टी.व्ही.संच , खेळाचे साहित्य पुरविले जाते. तसेच अशा गरजू शाळांमधे , विज्ञान शाखा तज्ञान कडून विद्यार्थ्यांना विज्ञानाचे मार्गदर्शन केले जाते. या शाळांमधून विशेष गुणवत्तेनी उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी रोख बक्षिसांचे वितरण करण्यात येते. विविध व्रुध्दाश्रमांमधून सत्संगाचे आयोजन करून तिथल्या व्रुध्द नागरीकांना मानसिक आधार देण्याचे श्रेष्ठ काम करण्यात येते. या सर्व उपक्रमांचा विस्तार करण्यासाठी न्यासाने विविध योजनाही आखल्या आहेत.
न्यासाचे कामकाज जरी विश्वस्त समिती पहात असली तरी न्यासाचे सदस्य , हितचिंतक या सर्व उपक्रमांमधून उत्साहानी सक्रीय सहभागी होत असतात. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे , या संस्थेला प. पू. श्रीकाका महाराजांचा भक्कम आधार व आशीर्वाद लाभले आहेत.
प्रस्तुत संकेत्स्थळावर , प. पू. श्रीकाका महाराजांचे संक्षिप्त चरित्र , त्यांनी स्थापन केलेल्या मंदिरांची माहिती , त्यांच्या कार्याचा संक्षिप्त आढावा , त्यांच्या श्रीसद्गुरूंचे संक्षिप्त चरित्र , त्यांच्या साहित्य व प्रवचन सी.डी. विषयी माहिती , त्यांचा एक लघु छायाचित्र संग्रह इ. पहावयास मिळेल. आणि त्याबरोबरच न्यासाच्या विश्वस्त समितीच्या सदस्यांची माहितीही दिली आहे.
अध्यक्ष
अध्यक्ष
सचिव
सचिव
ट्रेझर
ट्रेझर
सदस्य, विश्वस्त
सदस्य, विश्वस्त
सदस्य, विश्वस्त
सदस्य, विश्वस्त
सदस्य, विश्वस्त
सदस्य, विश्वस्त
सदस्य, विश्वस्त
सदस्य, विश्वस्त
सदस्य, विश्वस्त
सदस्य, विश्वस्त
सदस्य, विश्वस्त
सदस्य, विश्वस्त
विश्वस्त
विश्वस्त
अॅडव्होकेट
अॅडव्होकेट
प्रमाणित लेखापरीक्षक
प्रमाणित लेखापरीक्षक