|
जीवनज्योत।। श्रीसद्गुरवे नमः।।
स्वतः उच्च विद्याविभूषित असलेले प. पू श्री काका महाराज लोकांना शिक्षणाचं महत्व अतिशय तळमळिनी पटवून सांगत असतात . ते म्हणतात , "प्रत्येकानी शेवटपर्यंत विद्यार्थीदशेत राहिलं पाहिजे . प्रत्येक व्यक्तींनी शिकलं पाहिजे , शिक्षण हा आजच्या काळातला मनुष्याचा तिसरा डोळा आहे ." त्यांच्याच प्रेरणेनी गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी संस्था मदतीचा हात देत असते. या उपांतर्गत दर वर्षी गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणिक साहित्य मोफत प्रदान करण्यात येतं . याव्यतिरिक्त ग्रामीण भागातल्या गरजू शाळांना व वसतीगृहांना दर महा धान्य भाजीपाला व ईतर जीवनावश्यक वस्तूंची मदत संस्था करत असते . तसेच या शाळांमधून व वसतीगृहांमधून वैद्यकीय तपासणीच शिबिरांचं आयोजनही वेळोवेळी करण्यात येतं . कठीण परिस्थितीतही जिदीने शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिकूल परिस्थितीचे चटके बसू नयेत यासाठी त्यांना मदतीची सावली देण्याचं कार्य संस्था करत आहे . |





