English | मराठी
आगामी उपक्रम
मागोवा
वार्तापत्र र्वूत

मागोवा

दीपावलीनिमित्त दिवाळी फराळ आणि जीवनोपयोगी वस्तूंचं वाटप

प. पू. श्रीकाका महाराज म्हणतात, “दुस-याच्या चेह-यावरचा आनंद पाहून आपल्याला आनंद झाला पाहिजे. आपल्या बरोबरच दुस-याचाही विचार प्रत्येकानी केला पाहीजे.” ही शिकवण डोळ्यापुढे ठेवून, आपला आनंद जास्तीत जास्त लोकांमधे वाटण्यासाठी, संस्था विविध सण विविध लोकांसमवेत साजरा करते. या वर्षीही दीपावलीच्या निमित्तानी दिवाळी फराळ आणि भेटवस्तूंचं विविध ठिकाणी वाटप करण्यात आलं.

१) श्रीसांईमंदिर, कर्वेनगर, पुणे.

२) सांईनगर, माणिकबाग, पुणे.

३) शाहू कॉलनी, कर्वेनगर, पुणे.

४) दत्तवाडी, सिंहगड रस्ता, पुणे.

५) मातृकुल वृध्दाश्रम, पर्वती पायथा, पुणे.

६) हिवसेवाडा, चिटणीसपूरा, नागपूर.

७) मातोश्री व्रुध्दाश्रम , नागपूर

८) अर्पण आश्रम , पुणे

९) भूगाव , पुणे

१०) अभ्यासिका, महर्षिनगर, पुणे

११) विंझाई हायस्कूल, मुळशी, पुणे

१२) धर्मवीर ंभूराजे प्रतिष्ठान आश्रम, हडपसर, पुणे

१३) डा.भीमराव गस्ती उत्थान संस्था, बेळगाव

१४) नांदेड

१५) सूमति बालवन कात्रच, पूणे

१६) लूई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्था वाघोली, पूणे

१७) माई बालभवन अंध व गतीमंद संस्था, देहुरोड पूणे

१८) माझे माहेर शिवडी, मूंबई

१९) अन्सर वाड, लातूर

इत्यादी ठिकाणी सूमारे ३५०० लोकांन पर्यन्त दिवाळी फराळ आणि भेट्वस्तूंचं वाटप करण्यात आलं.

मोफत आरोग्य तपासणी आणि दंतचिकित्सा शिबिर, विठ्ठल मंदिर, अचानक चौक, पूणे (१८-०-२०१५)

मानवसेवा हीच ईश्वरसेवा या ब्रीदवाक्याला अनुसरून प.पू.सद्गुरूनाथ श्रीकाका महाराज सेवा परिवाराच्या वतीने, दि. १८-१०-२०१५ रोजी , विठ्ठल मंदिर, अचानक चौक, राम नगर, पूणे येथे मोफत आरोग्य तप ासणी आणि दंतचिकित शि बिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास उत्तम प्रतिसाद मिळाला.

सकाळी १० वाजल्यापासून शिबिराला सुरुवात झाली. सुमारे २०० लोकांनी या सेवेचा लाभ घेतला. शिबिरार्थींना, प.पू. श्रीकाका महाराजांवर रचलेल्या नित्यपाठ या ओवीबध्द पुस्तकाचे वाटपही करण्यात आले.डॅा. अश्विनी बूधे यांचे संस्था मनापासून आभार मानते.

 

फ़िजिकल फ़िटनेस तपासणि शिबिर, मनोरे हायस्कूल, धायरि, पूणे (१५-०-२०१५)

 

मोफत आरोग्य तपासणी शिबिर मातोश्री वृध्दाश्रम आदास (३०-०-२०१५)

दि. ३०-०-२०१५ ला संस्थेनी नागपूर येथील मातोःश्री वृध्दाश्रमात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलं. वृध्दाश्रमात राहणार्या ८० वृध्द सदस्यांनी त्याचा लाभ घेतला. आरोग्य तपासणीबरोबरच मोफत औषधांचे वाटपही करण्यात आले. या शिबिरासाठी बहुमोल योगदान देणार्या डॉ. हर्षा वैद्य व डॉ. अश्विनी बुधे यांचे, संस्था मनःपूर्वक आभार मानते.

मोफत आरोग्य तपासणी शिबिर, धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठान संचलित आश्रमशाळा, तुकाई टेकडी, काळेपडळ, पुणे. (१-०-२०१५)

दि. १-०-२०१५, रोजी संस्थेतर्फे आश्रमशाळेत एका आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं. आश्रमातल्या सुमारो ८० विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी मोफत करण्यात आली व औषधांचं वितरण करण्यात आलं.

या शिबिरासाठी डॉ . अश्विनी बूधे यांचे बहुमोल योगदान दिले. यासाठी संस्था त्यांची मनःपूर्वक आभारी आहे.

वारकर बंधू भगीनींन करीता मोफत आरोग्य तपासणी शिबिर, बिबवेवाडी, पूणे  (११-०-२०१)

दि. ११-०-२०१ रोजी प. पू. सद्गुरूनाथ श्री काका महाराज सेवा परिवार, पूणे यांच्या वतीने बिबवेवाडी येथील यशवंतराव चव्हान शाळेमध्ये मुक्कामी असलेल्या – श्री संत श्रेष्ट जगद्गुरू तुकाराम महाराज संस्थान  सोनखेड व परिसर, वारकरी बंधू भगीनींची तज्ञ डाक्टरांकडून आरोग्य तपासणी करून मोफत औषध वाटप करण्यात आले.

डॉ. प्रल्हाद शिंदे, डॉ.पल्लवी डफळ, डॉ . सतिश कळसकर, डॉ . अश्विनी बूधे, डॉ.दिपक शिंदे, डॉ.सूरज नाईक, व डॉ.नीना नाईक आणि त्यांचे सहकारी यांनी आपले महत्वाचे योगदान दिले. या प्रसंगी सेवा परिवाराचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी १० ते दु. ४ या वेळात ७५०  वार री बंधू भगीनींनी याचा लाभ घेतला.

 

मोफत आरोग्य तपासणी शिबिर, धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठान संचलित आश्रमशाळा, तुकाई टेकडी, काळेपडळ, पुणे. (२१-०६-२०१५)

दि. २१-०६-२०१५, रोजी संस्थेतर्फे आश्रमशाळेत एका आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं. आश्रमातल्या सुमारो ८० विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी मोफत करण्यात आली व औषधांचं वितरण करण्यात आलं.

या शिबिरासाठी डॉ. हर्षा वैद्य यांचे बहुमोल योगदान दिले. यासाठी संस्था त्यांची मनःपूर्वक आभारी आहे.

शालेय वस्तू वाटप पूणे  (१३-०६-२०१ ) नागपूर (६-०७-२०१५)

दर वर्षीप्रमाणे या वर्षीही संस्थेतर्फे गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना वह्या व इतर शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला. प.पू.श्रीकाका महाराजांच्या सांईमंदिरात हा कार्यक्रम पार पडला. तसेच दि. ६.७.२०१५ रोजि, नागपूर येथील बाल सदन अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांना वह्या व इतर शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

प.पू.श्रीकाका महाराज वारंवार शिक्षणाचं महत्व लोकांना पटवून देत असतात. ते म्हणतात की , स्वतःच्या आणि देशाच्याही प्रगतीसाठी प्रत्येकानी शिकलं पाहिजे. यासाठीच संस्थेतर्फे प्रतिवर्षी हा उपक्रम राबवला जातो, ज्यायोगे गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत होते आणि त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळतं.

 

मोफत आरोग्य तपासणी शिबिर, विठ्ठल मंदिर, अचानक चौक, राम नगर, पूणे (०३-०५-२०१५)

मानवसेवा हीच ईश्वरसेवा या ब्रीदवाक्याला अनुसरून प.पू.सद्गुरूनाथ श्रीकाका महाराज सेवा परिवाराच्या वतीने, दि. ०३-०५-२०१५ रोजी , विठ्ठल मंदिर, अचानक चौक, राम नगर, पूणे येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास उत्तम प्रतिसाद मिळाला.

सकाळी १० वाजल्यापासून शिबिराला सुरुवात झाली. सुमारे २०० लोकांनी या सेवेचा लाभ घेतला. शिबिरार्थींना, प.पू. श्रीकाका महाराजांवर रचलेल्या नित्यपाठ या ओवीबध्द पुस्तकाचे वाटपही करण्यात आले.डॅा. अश्विनी बूधे यांचे संस्था मनापासून आभार मानते.

मोफत आरोग्य तपासणी शिबिर वाल्मीकी अनाथाश्रम, नागपूर (१४-४-२०१५)

नागपूर येथील वाल्मीकी अनाथाश्रमातल्या मुलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिविराचे आयोज करण्यात आले. या शिविरात डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधेही संस्थेतर्फे मोफत देण्यात आली. त्याचबरोबर प्राथमोपचाराचा संच आश्रमाला प्रदान करण्यात आला. या शिविरासाठी डॉ. अश्विनी बुधे यांनी मोलाचे योगदान दिले. त्यासाठी संस्था त्यांची आभारी आहे.

 

मोफत आरोग्य तपासणी शिबिर मातोश्री वृध्दाश्रम आदासा (५-४-२०१५)

दि. ०५-०४-२०१५ ला संस्थेनी नागपूर येथील मातोःश्री वृध्दाश्रमात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलं. वृध्दाश्रमात राहणार्या ८० वृध्द सदस्यांनी त्याचा लाभ घेतला. आरोग्य तपासणीबरोबरच मोफत औषधांचे वाटपही करण्यात आले. या शिबिरासाठी बहुमोल योगदान देणार्या डॉ. हर्षा वैद्य व डॉ. अश्विनी बुधे यांचे, संस्था मनःपूर्वक आभार मानते.

 

मोफत आरोग्य तपासणी शिबिर विंझाई हायस्कूल , ताम्हिणी (७-०३-२०१५)

मानवसेवा हीच ईश्वरसेवा या ब्रीदवाक्याला अनुसरून प.पू.सद्गुरूनाथ श्रीकाका महाराज सेवा परिवाराच्या वतीने, दि. ७.३.२०१५ रोजी , विंझाई हायस्कूल , ताम्हिणी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा स्थानिक तसेच शाळेतील मूलानी लाभ घेतला.

सकाळी १० वाजल्यापासून शिबिराला सुरुवात झाली. सुमारे १०० लोकांनी या सेवेचा लाभ घेतला. डॅा. अश्विनी बूधे यांचे संस्था मनापासून आभार मानते.

 

कपडे वाट्प - धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठान अनाथाश्रम (२५-०२-२०१५)

दि.२५-०२-२०१५ ला संस्थेतर्फे , हडपसर येथील शंभूराजे प्रतिष्ठानतर्फे चालविल्या जाणा-या आश्रमात राहणा-या सुमारे १०० मुलां करीता मोफत कपडे वाटप शिबिर घेण्यात आला.

 

मोफत आरोग्य तपासणी शिबिर – ’ माझे माहे मुलींचे वसतीग्रुह , मुंबई ( १५-०२-२०१५)

आपल्या कार्याच्या कक्षा रुंदावताना , संस्थेनी परत मुंबईत एका आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलं. ’माझे माहेर’ या मुंबईतल्या अनाथ मुलींच्या वसतीग्रुहात हे शिबिर घेण्यात आलं. या शिबिरात सर्व औषधांचे मोफत वाटप  करण्यात आले. या शिबिरात १०० मुलं व मुलींची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. डा. अश्विनी बुधे यांनी बहुमूल्य योगदान दिले.

 

मकर संक्रत साजरा, पूणे व नागपूर (२०१)

 

’मानवसेवा हीच ईश्वरसेवा’ हे ब्रीद असणारे प. पू. सद्गुरूनाथ श्रीकाका महाराज नेहमी सांगतात की , “ दुस-याच्या चेह-यावरचा आनंद पाहून आपल्याला आनंद झाला पाहिजे. प्रत्येकानी स्वतःबरोबर दुस-याचाही विचार केला पहिजे.” त्यांच्या या शिकवणीनुसार आणि त्यांच्याच प्रेरणेने व प्रोत्साहनाने मकर संक्रांत आणि दीपावली या दोन सणांना संस्थेतर्फे विविध ठिकाणी तीळगुळ आणि दिवाळी फराळ तसेच भेटवस्तू यांचं वाटप केलं जातं. या वर्षीही मकर संक्रातीच्या निमित्ताने सेवापरिवारातर्फे तिळगुळ व प.पू.श्रीकाका महराजांचा संदेश असलेल्या शुभेच्छापत्रांचे वाटप करण्यात आले. या शुभेच्छापत्रांचे वैशीष्ट्य म्हणजे त्यावर प.पू.श्रीकाका महाराजांच्या संदेशासह त्यांची स्वाक्षरी आहे…!!

संस्थेतर्फे पुण्यात, नागपूरमधे व नांदेड इथे ज्या ज्या ठिकाणी सत्संगाचे आयोजन केले जाते त्या प्रत्येक ठिकाणी, आणि त्याव्यतिरिक्त खालील ठिकाणी हे वाटप करण्यात आले.

विंझाई हायस्कूल, ताम्हिणी

अभ्यासिका, महर्षीनगर

धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठान संचलित आनंददायी आश्रम शाळा, हडपसर

बालसदन, नागपूर

माझे माहेर , मुंबई

याशिवाय डा.भीमराव गस्ती संचलित देवदासी मुलींचा आश्रम उत्थान, बेळगाव येथे तीळगुळ आणि शुभेच्छा पत्रांसह ४०० वह्या , ४०० पेन्स , ब्लैंकेट्स , चादरी , सतरंज्या इत्यादी वस्तूही प्रदान करण्यात आल्या.

“ तिळगुळ घ्या, गोड बोला ” असे म्हणून ,’ जय सांईराम ’ या परवलीच्या शब्दानी या तिळगुळ वाटपाचा आनंद सर्वांबरोबर वाटण्यात आला.

धर्मार्थ दवाखान्याचं उद्घाटन (३०-१२-२०१४)

 

गरीब आणि गरजू लोकांना आरोग्य तपासणी सुविधा आणि औषधोपचार मोफत उपलब्ध व्हावा ही प.पू.श्रीकाका महाराजांची तळमळ आहे. आणि त्यांच्याच इच्छेनुसार या दिशेनी पहिलं पाऊल संस्थेनी टाकलं आहे. दर रविवारी सायंकाळी ६ वाजता हिवसेवाड्यात गरजू लोकांना मोफत आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध केली आहे. डा. हर्षा वैद्य आणि डा. अश्विनी बुधे यांच्या सहकार्यानी हा धर्मार्थ दवाखाना चालविण्यात येणार आहे.

दि. ३० डिसेंबर २०१४ या दिवशी स्वतः प.पू.श्रीकाका महाराजांच्या हस्ते या दवाखान्याचं उद्घाटन झालं.