आगामी उपक्रम
मागोवा
वार्तापत्र र्वूत

मागोवा

श्रीदत्तजयंती, प.पू. श्रीकाका महाराजांचा जन्मदिन त्यानिमित्त उपक्रम

लोककल्याणासाठी अखंड झिजणा-या प.पू.सद्गुरूनाथ श्रीकाका महाराजांचा जन्मदिवस म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमा , म्हणजेच श्रीदत्तजयंतीचा दिवस……..!! जनकल्याणाचं अखंड व्रत घेतलेल्या , सतत सर्वांना भरभरून देणा-या , “ सतत दुस-याच्या आनंदाचा विचार करा ” असं सांगणा-या श्रीमहाराजांच्या जन्मदिनानिमित्त , डिसेंबर महिन्यात संस्थेनी चार ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचं आयोजन केलं.

दि. १ डिसेंबर २०१३ ला नागपूरमध्ये ‘बालसदन’ या अनाथाश्रमात आणि ‘मातोश्री’ या व्रुध्दाश्रमात , अशा दोन ठिकाणी सर्वसाधारण आरोग्य तपासणी शिबिरांचं आयोजन करण्यात आलं.

दि. ७ डिसेंबर २०१३ ला , मुळशीच्या ताम्हिणी भागातल्या ‘विंझाई हायस्कूल’ इथे सर्वसाधारण आरोग्य तपासणी आणि दंतचिकित्सा शिबिराचं आयोजन करण्यात आलं.

दि. १५ डिसेंबर २०१३ ला , हडपसर इथल्या ‘आनंददायी’ या लहान मुलांच्या आश्रमात सर्वसाधारण आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं.

या सर्व शिबिरांसाठी , डॉ. हर्षा वैद्य , डॉ. अश्विनी बुधे , डॉ. सतीश कळसकर , डॉ. शिंदे यांनी सहकार्य केलं

या शिबिरांबरोबरच , श्रीमहाराजांच्या भक्तपरिवारातील बालचमू आणि युवावर्गानी , श्रीमहाराजांना एक अल्पशी भेट म्हणून , हडपसर इथल्या ‘आनंददायी’ या लहान मुलांच्या आश्रमात आणि ताम्हिणी भागातल्या ‘विंझाई हायस्कूल’ मधल्या वसतीग्रुहात ब्लैंकेट्स आणि तिथल्या शाळांमधे लेखनोपयोगी साहित्याचं वाटप केलं. बालचमू आणि युवावर्गाच्या या उपक्रमातून श्रीमहाराजांच्या शिकवणीचाच प्रत्यय आला.

मोफत आरोग्य शिबीर, विंझाई हायस्कूल, ताम्हिणी (२३-०७-२०१३)

मोफत आरोग्य शिबीर, आनंदाई अनाथआशर्म हडपसर (२०-०७-२०१३)

हडपसर येथील आनंददायी अनाथाश्रमातल्या मुलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिविराचे आयोज करण्यात आले. या शिविरात डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधेही संस्थेतर्फे मोफत देण्यात आली. त्याचबरोबर प्राथमोपचाराचा संच आश्रमाला प्रदान करण्यात आला. या शिविरासाठी डॉ. अश्विनी बुधे यांनी मोलाचे योगदान दिले. त्यासाठी संस्था त्यांची आभारी आहे.

मोफत शालेय वस्तूंचे वाटप पूणे व नागपूर (०७-०७-२०१३)

गरजू व होतकरू शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्याना संस्थेतर्फे मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात येते. दि. ०७-०७-२०१३ ला, पुण्यात पूजनीय सौ. काकू माउलींच्या हस्ते शालेय साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला स्वतः प. पू. श्रीकाका महाराज उपस्थित होते. श्रीमहाराजांनी सर्व विद्यार्थ्याना शिक्षणाचे महत्व समजावून सांगितले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद दिले.

नागपूरमध्येही दि. ०६-०७-२०१३ ला गरजू विद्यार्थ्याना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. संस्थेच्या नागपूरमधल्या सभासदांनी या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला.

वारकर्यांन साठी मोफत आरोग्य शिबीर पूणे (०१-०७-२०१३)

कपडे वाटप मातोश्री वृध्दाश्रम नागपूर (३०-०६-२०१३)

नागपूर येथील मातोश्री वृध्दाश्रम मध्ये राहणा-या आजी - आजोबांना साठी कपडे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्याच सोबत संस्थेच्या नागपूर शाखेने त्यांच्या सोबत जेवणाचा कार्यक्रम केला. संस्थेच्या कार्यक्रत्यांची आपूलकी बघून वृध्दाश्रमात राहणारे सर्व आजी आजोबा फार आनंदी झाले.

विंझाई हायस्कूल, ताम्हिणी येथे विविध वस्तू प्रदान समारंभ (०१-०५-२०१३)

ताम्हिणी येथील विंझाई हायस्कूल, या शाळेतल्या व तिथल्या वसतीगृहातल्या गरजू विद्यार्थ्यांसाठी संस्थेतर्फे संगणक, कपाटं, चादरी, ब्लॅंकेट्स, जॅकेट्स, टेबल्स तसंच इतर काही वस्तू प्रदान करण्यात आल्या.

दि. १ मे , महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने होणार्या झेंडावंदन कार्यक्रमात संस्थेचे सभासद असलेल्या श्रीकाकासांईपरिवारातल्या ५२ सदस्यांनी सहभाग घेतला आणि वस्तू प्रदान कार्यक्रम उत्साहात पार पाडला.

मोफत आरोग्य तपासणी शिबिर फणसराई, ऊदेवाडी व वनाटी (२१-०४-२०१३)

दि. २१-०४-२०१३ ला संस्थनी फणसराई, वनाटी, उदेवाडी या दुर्गम भागातल्या आदिवासी बांधवांसाठी एक मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलं. सुमारे ८० आदिवासी बांधवांनी या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिरात तपासणीबरोबरच मोफत औषधांचं वाटपही करण्यात आलं.

या शिबिरासाठी डॅा.सौ.अश्विनी बुधे नागपूरहून आल्या होत्या. त्यांनी दिलेल्या योगदानासाठी संस्था त्यांची मनःपूर्वक आभारी आहे.

संस्थेच्या नागपूर शाखेच्या कार्यालयाचं उद्घाटन (१९-०४-२०१३)

पुण्याबरोबरच नागपूरमध्येही संस्थेच्या सभासदांची संख्या वाढत आहे , आणि त्याचबरोबर संस्थेच्या कार्याची व्याप्तीही झपाट्यानी वाढत आहे. नागपूरमधील कामकाजासाठी संस्थेचे शाखा-कार्यालय सुरु करण्याचे ठरले आणि त्यानुसार , दि. १९ एप्रिल २०१३ , श्रीरामनवमीच्या पावन दिवशी , संस्थेच्या पहिल्या शाखा-कार्यालयाचे उद्घाटन, नागपूरमधील सुप्रसिध्द समाजसेवक, माननीय श्री. देवीदासपंत हिवसे यांच्या हस्ते संपन्न झाले. हे कार्यालय नागपूरमधल्या हिवसेवाडा, चिटणवीसपुरा, महाल येथे आहे

मोफत दंतचिकित्सा शिबिर, गुरुकुलम्, चिंचवड (१७-०३-२०१३)

चिंचवडमधील गुरुकुलम या अनाथ मुलांच्या आश्रमात संस्थेनी मोफत दंतचिकित्सा शिबिराचे आयोजन केले. सर्व मुलांची दंत तपासणी करून, आवश्यक औषधांचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर टूथब्रश आणि टूथपेस्टचे वाटपही करण्यात आले. ज्या मुलांना पुढील उपचारांची आवश्यकता आहे त्यांच्यावर पुढील उपचारही संस्था करणार आहे.

Dया शिबिरासाठी डॅा. रासे शेख, डॅा. नेहा यांचे मोलाचे योगदान लाभले. या दोघांचे, संस्था मनःपूर्वक आभार मानते.

मोफत आरोग्य चिकित्सा शिबिर, मांडगाव जि. वर्धा (१०-०३-२०१३)

आपल्या कार्याच्या कक्षा रुंदावताना, संस्थेनी नागपूरनंतर मांडगाव, वर्धा इथे, जी.वी.हिवसे गुरुजी मेमोरिअल ट्रस्ट च्या संयुक्त विद्यमाने एका मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलं. हा संस्थेचा वर्ध्यामधला पहिलाच उपक्रम होता, पण अतिशय उत्तम प्रतिसाद या उपक्रमाला लाभला. वर्धा आणि मांडगावच्या सुमारे ४०० गरजूंनी या शिबिराचा लाभ घेतला.

महाशिवरात्रीचे औचित्य साधून या शिबिराचे आयोजन, अतिशय उत्तम प्रकारे झालं, आणि यासाठी संस्था, डॅा. हर्षा वैद्य, डॅा. अश्विनी बुधे, श्री. तुषार हिवसे आणि जी.वी.हिवसे ट्रस्टच्या सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानते.

सत्संग, नागपूर. (२०-०१-२०१३)

आयुष्य अमूलाग्र बदलून टाकणारे, आयुष्याला एक सकारात्मक दिशा देणारे आणि मनुष्याला आनंदी व निर्भीड बनवणारे, प.पू.सद्गुरूनाथ श्रीकाका महराजांचे अमृतमयी विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावेत यासाठी संस्था विविध ठिकाणी सत्संगाचे आयोजन करत आहे.

या उपक्रमाअंतर्गतच नागपूरमध्येही संस्थेतर्फे सत्संगाचं आयोजन केलं जातं. दर रविवारी सायंकाळी हिवसेवाडा, नागपूर येथे, प.पू.श्रीकाका महाराजांच्या सी.डी.द्वारे सत्संग घेतला जातो.

परंतु २० जानेवारी २०१३ ला जो सत्संग झाला त्याला सोन्याची झळाळी प्राप्त झाली. प.पू.सद्गुरूनाथ श्रीकाका महाराजांच्या पावन सान्निध्यात हा सत्संग मोठ्या उत्साहात पार पडला. स्वतः प.पू.श्रीकाका महाराजांनी आपल्या ओघवत्या रसाळ वाणीतून उपस्थित लोकांना मोलाचे मार्गदर्शन केले.

या सत्संगासाठी श्रीकाकासांईपरिवारातले,पुण्याहून ३० जण तर काही जण मुंबईहून नागपूरमध्ये दाखल झाले होते. प.पू.श्रीकाका महाराजांच्या पुणे, मुंबई आणि नागपूरच्या भक्तगणांचा मेळावाच जमला होता. हा आनंदसोहळा खूप उत्साहात आणि आनंदात पार पडला. जय सांईराम.

मोफत आरोग्य तपासणी शिबिर नागपूर (२०-०१-२०१३)

दि. २० जानेवारी २०१३ ला संस्थेनी नागपूरमध्ये, हिवसेवाडा येथे एका मोठ्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलं. या शिबिरात दंतचिकित्सा, नेत्रतपासणी, रक्ततपासणी, सर्वसाधारण आरोग्य तपासणी, अस्थीरोग तपासणी, बालरोग तपासणी इ. तपासण्या मोफत करण्यात आल्या. तसेच रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले.

या शिबिरात औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. तसंच प.पू.श्रीकाका महाराजांवर रचलेल्या नित्यपाठ या दैनंदिन उपासनेच्या पुस्तकाचे वाटपही शिबिरार्थींना करण्यात आले.

सुमारे ३५० लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिरासाठी, डॉ. मोहमद फेयजान, डॉ.सुची गुप्ता, डॉ.मुकेश ठाकर, डॉ. अश्विनी बुधे, डॉ. हर्षा वैद्य, यांनी मोलाचे योगदान दिले. तसेच, डॉ. महात्मे नेत्रपेठी व नेत्र रुगणालय व डॉ. हेडगेवार रक्तपेटी यांनी मोलाचे योगदान दिले. या सर्वांचे संस्था मनापासून आभार मानते.