आगामी उपक्रम
मागोवा
वार्तापत्र र्वूत

मागोवा

सत्संग

सत्संग’ हा श्रीकाका महाराजांचा अत्यंत आवडीचा, जिव्हाळ्याचा विषय. हा सत्संग २००० सालापासून श्रीमहाराजांच्या सांईमंदिरात अविरत चालू आहे.

श्रीकाका महाराजांच्या नुसतं कानावर घातल्याने कसल्याही जीवघेण्या संकटातून जगातला कुठलाही माणूस निभावून जातो हा अनेक वर्षांचा अनुभव आहे. परंतु एक समस्या सुटली की दुसरी समोर उभीच आहे. मग ज्या आनंदाची मला माझ्या श्रीसद्गुरूंनी ओळख करुन दिली तशी ती प्रत्येकाला कधी होणार ? हा विचार श्रीकाकामहाराजांच्या मनात सुरु झाला आणि त्या अनुषंगाने त्यांनी हा सत्संगाचा प्रपंच सुरु केला. मूळचे मितभाषी असलेले श्रीकाका महाराज या सत्संगाच्या माध्यमातून बोलू लागले, सर्वांशी संवाद साधू लागले, इतकंच नाही तर सामान्यांनाही बोलतं करू लागले. आणि हा सत्संग उत्तरोत्तर रंगत गेला, विस्तारत चालला.

श्रीकाका महाराज अंतर्ज्ञानी आहेत, सर्वज्ञ आहेत. गरजूंच्या छोट्या छोट्या अडचणी जाणून घेतात, यातूनच या सत्संगाचा विस्तार करण्याचं त्यांनी ठरवलं. आपल्यापासून लांब राहणार्या लोकांसाठी त्या, त्या वस्तीत जाऊन सत्संग सुरु करण्याचं ठरलं आणि त्यांच्या आशीर्वादाने आज पुण्यात सहा ठिकाणी आणि नागपूरला एका भक्तांच्या घरी सत्संगाचा लाभ सर्वसामान्यांना मिळत आहे.

या सत्संगात महाराजांच्या रसाळ आणि मधुर वाणीतील प्रवचने प्रत्यक्ष त्यांच्या आवाजात आठवड्यातून एकदा आपल्याला ऐकायला मिळतात. श्रीकाका महाराजांच्या प्रवचनांचा प्रभाव असा की एकदा लक्षं देऊन ऐकलं की त्यातील विचार कित्येक दिवस आपल्या मनात घोळत राहतात आणि परत परत ऐकलं तरी दर वेळी काही नविन शिकायला मिळतं. अगदी रोज आपल्या घरात घडणार्या गोष्टींचे दाखले देऊन श्रीमहाराज हा सत्संग आपल्यात रुजवतात, आपल्याला निर्भीड तसंच आनंदी बनवतात. कसल्याही परिस्थितीचा, संकटाचा सामना करण्याचं बळ या सत्संगातून मिळतं. श्रीमहाराज आपल्याला नामसाधनेकडे वळवतात. अध्यात्म अगदी सोपं करून सांगतात.

या पवित्रं, मंगलमय सत्संगाचा आनंद जास्तीत जास्त लोकांना मिळावा ही सद्गुरू श्रीकाका महाराजांच्या चरणी प्रार्थना !

परम पूजनीय सद्गुरूनाथ श्रीकाका महाराजांची ओजस्वी, चैतन्यमयी विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी संस्थेतर्फे खालील ठिकाणी सत्संगाचे आयोजन केले जाते.

  1. श्रीसांईमंदिर, कर्वेनगर, पुणे

  2. सांईनगर, माणिकबाग, पुणे

  3. शाहू कॉलनी, कर्वेनगर, पुणे

  4. दत्तवाडी, सिंहगड रस्ता, पुणे.

  5. मातृकुल वृध्दाश्रम, पर्वती पायथा, पुणे

  6. संकल्प आश्रम, डोणजे, पुणे

  7. हिवसेवाडा, चिटणीसपूरा, नागपूर.

नविन ऑफस चे उदघाटन (०६-१०-२०११)

मोफत आरोग्य, नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, चिटणवीसपूरा नागपूर (२१-०८-२०११)

मानवसेवा हिच खरी ईश्वर सेवा, हे बोधवाक्य समोर ठेवून गरीब व गरजू नागरीकांना मदत करण्याचे काम चालू ठेवीत प. पू. श्रीकाका महाराज सेवा परीवाराच्या वतीने दिं – २१-०८-२०११, रोजी महाराष्ट्रातील नागपूर येथील चिटणवीस पुरा येथे मोफत आरोग्य तपासणी व डोळे तपासणी शिबीर तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आला. अशा प्रकारचे ट्रस्टच्या वतीने नागपूरमध्ये घेण्यात आलेले हे तीसरे शिबीर होते व त्यास उत्तम प्रतिसाद मिळाला.

सदर विभागातील नामवंत फिजीशियन डॅा. सौ. हर्षा वैद्य व डॅा. सौ. अशविनी बूधे, यांनी महात्मे हॅास्पिटलच्या डॅाक्टरांबरोबर मोफत सल्ला तसेच मोफत औषधे अंदाजे २०० पेक्षा जास्त रुग्णांना दिली. वरील तपासण्यां बरोबरच सदरील शिबीरा मध्ये मोफत रक्त शर्करा व रक्त दाब इत्यादींच्या मोफत तपासण्या करण्यात आल्या.

जवळपास १९ रूग्णांच्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अगदी दुस-या दिवशी महात्मे आय बँक व हॅास्पिटलच्या साह्याने केल्या गेल्या.

सदरील शिबिराला महाल विभागातील नागरीकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाल्यामूळे परिवारातर्फे भविष्यात सदरील विभागामध्ये अशाच प्रकारची शिबिरे घेण्याचे ठरविलेले आहे. प. पू. सद्गुरूनाथ श्री. काका महाराज सेवापरिवारा, डॅा. सौ हर्षा वैद्य, डॅा. सौ अश्विनी बुधे व महात्मे आय बँक व हॅास्पिटलच्या यांचे शिबिरासाठी दिलेल्या योगदानासाठी आभार मानत आहे.

फणसराई - प्रगतीची वाटचाल

प. पू. सद्गुरूनाथ श्री. काका महाराजाच्यां आशिर्वादानी, हाती घेतलेले फणसराई या दुर्गम गावामधील गोरगरीब नागरीकांना नवीन पक्की घरे बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे.

फणसराई गावाचा विकास

प. पू. सद्गुरूनाथ श्री. काका महाराज सेवापरिवाराच्या वतीने महाराष्ट्रातील पुणे जिल्हातील मावळ तालुक्यामधील लोणावळा जवळील फणसराई यया दुर्गम गावामधील गोरगरीब नागरीकांना नवीन पक्की घरे बांधण्याचे काम चालू आहे. त्यामुळे लवकरच फणसराई गांव हे नवीन पक्क्या घरांच्या स्वरुपात दृष्टीस येईल. अशा प्रकारे सदरील गांवातील नागरीकांना नवीन पक्क्या घरामध्ये राहण्याचा आनंद मिळणार आहे.

मागील महिन्यामध्ये प. पू. सद्गुरूनाथ श्री. काका महाराज सेवापरिवाराच्या सदस्यांनी फणसराई गावाला अनेकवेळा भेटी देवून घरांसाठी पाया, सांगाडे इत्यादी काम पूर्ण केले. सध्या परिस्थितीमध्ये बहुतांशी घरांच्या सांगाड्याचे, काम पूर्ण झालेले आहे, त्यामुळे बांधावयास घेतलेली सर्व घरे येणा-या पावसाळ्यापूर्वीच बांधून पूर्ण होतील.

सेवापरिवारच्या या कार्याचे वेगळेपण म्हणजे सेवापरिवाराच्या वतीने सदरील घरे बांधण्यासाठी फक्त बांधकाम साहित्याचा पुरवठा करण्याबरोबरच काही सदस्यांनी प्रत्यक्ष बांधकाम उभारणी कामासाठी सहभाग देखील घेतलेला आहे.

प. पू. सद्गुरूनाथ श्री. काका महाराज सेवापरिवाराच्या वतीने नागरीकांना पुन्हा एकदा सदरील कार्यासाठी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे, की ज्यामुळे अनेक गरीब, बेघर लोकांना पक्की घरे बांधून देता येतील.

रक्तदान शिबिर, नागपूर (२७-०२-२०११)

प. पू. सद्गुरूनाथ श्री काका महाराज सेवापरीवाराच्या वतीने तसेच डॅा. हेडगेवार रक्तपेटीच्या सहकार्याने दिनांक २७-०२-२०११ रोजी नागपूर येथील तात्याटोपे नगर येथील श्री गणेश मंदिरामध्ये 'रक्तदान' शिबीराचे आयोजन केले होते. सदरच्या शिबीराला नागरीकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. अंदाजे ५० रक्तदात्यांनी शिबीरात भाग घेऊन रक्तदान केले.

प. पू. सद्गुरूनाथ श्री काका महाराजांच्या आध्यात्मिक साहित्याच्या विक्रीचा स्टॅाल लावण्यात आला व प. पू. सद्गुरूनाथ श्री काका महाराजांच्या सीडीज् लोकांना ऐकविण्यात आल्या.

मोफत रक्ततपासणी शिबिर, वडगांव पूणे (२०-०२-२०११)

प. पू. सद्गुरूनाथ श्री काका महाराज सेवापरीवाराच्या वतीने दिनांक २०-०२-२०११ रोजी पूणे येथील सिंहगडरोड वरील वडगांव येथे मोफत रक्त तपासणी शिबीर घेण्यात आले. सदरील शिबीरास जगत क्लिनीक, रवीवारपेठ, पूणे यांचे सहकार्य लाभले. सदरील शिबीरामध्ये मोफत रक्तगट तपासणी, हिमोग्राम व रक्त शर्करा यांच्या तपसण्या केल्या गेल्या. सदरच्या शिबीराला नागरीकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. वडगांव व आसपासच्या परीसरातील अंदाजे २०० पेक्षा अधीक लोकांनी शिबीराजा लाभ घेतला.

प. पू. सद्गुरूनाथ श्री काका महाराजांच्या आध्यात्मिक साहित्याच्या विक्रीचा स्टॅाल लावण्यात आला व प. पू. सद्गुरूनाथ श्री काका महाराजांच्या सीडीज् लोकांना ऐकविण्यात आल्या.

मोफत आरोग्य तपासणी शिबिर, वडगांव पूणे (१३-०२-२०११)

मोफत रक्ततपासणी शिबिर, वडगांव पूणे (२३-०१-२०११)

प. पू. सद्गुरूनाथ श्री काका महाराज सेवा परिवारा तर्फे वडगाव, सिंहगडरोड येथील मनपा मुलींची शाळा क्रं २०३ बी मध्ये दि. २३-०१-२०११ रोजी मोफत रक्त तपासणी शिबीर आयोजीत केले गेले. या शिबीरासाठी सुप्रसिध्द समाजसेवक श्री. हरीदास चरवड व जगत क्लिनिक, रविवार पेठ, पुणे यांचे विशेष सहकार्य लाभले. या शिबीरात २६० लोकांची मोफत रक्त गट, हेमोग्राम व रँडम रक्त शर्करा तपासणी करण्यात आली.

प. पू. सद्गुरूनाथ श्री काका महाराजांच्या आध्यात्मिक साहित्याच्या विक्रीचा स्टॅाल लावण्यात आला व प. पू. सद्गुरूनाथ श्री काका महाराजांच्या सीडीज् लोकांना ऐकविण्यात आल्या.

“मंथन” (अमृतधारा भाग २) प्रकाशीत

प. पू. सद्गुरूनाथ श्री काका महाराजांच्या ‘अमृतधारा भाग २’ या पुस्तकाची साधक चातकासारखी वाट पहात होते. “मंथन” (अमृतधारा भाग २) या नावाने प. पू. सद्गुरूनाथ श्री काका महाराजांनी, श्री दत्तजयंती दि. २०-१२-२०१० रोजी प्रकाशीत केले. नाम साधना हे मुख्य सूत्र कायम ठेऊन “मंथन” या पुस्तकात श्री काका महाराजांनी प्रश्नोत्तर रूपाने साधकाला साधना मार्गात पडणार्या शंका यावर ओघवत प्रबोधन केले आहे.

श्री सद्गुरूंची अनुभूती म्हणजे काय ? निराशेच्या क्षणावर कशी मात करावी ? कर्मयोग हा भक्तीयोग पेक्षा पुढे आहे कां ? या सारख्य अनेक प्रश्नाची उत्तर दिली आहेत. मंथन चा अभ्यास हा साधकाच्या मनात विचार मंथन सुरू करेल यात शंका नाही. मंथन हे पुस्तक श्री सांई मंदिरात व या संकेत स्थळा व्दारे विक्रीसाठी उपलब्ध आहे.

फणसराई वस्तीचा विकास

दिनांक – ०२-०१-२०११

प. पू. सद्गुरूनाथ श्री काका महाराज सेवापरिवाराच्या सदस्यांनी दि. ०२-०१-२०११ रोजी, डॅा. सूरज नाईक यांच्या सोबत फणसराई वस्तीला भेट दिली. डॅा. सूरज नाईक, बालाजी हॅास्पिटळ, धनकवडी, पूणे यांनी फणसराई व उदेवाडी या दोन्ही वस्तीतील लोकांची मोफत आरोग्य तपासणी केली व मोफत औषध वाटलीत.

या भेटेत उदेवाडी वस्तीतील लहान मूलांना कपडे वाटप करण्यात आले. तसेच फणसराई वस्तीत पदत्रणचे व आंगाचे व कपड्याच्या साबणाचे वाटप करण्यात आले

दिनांक – २६-१२-२०१०

प. पू. सद्गुरूनाथ श्री काका महाराज सेवापरिवाराच्या सदस्यांनी दि. २६-१२-२०१० रोजी फणसराई वस्तीला भेट दिली. तेथिल लोकांना कपबशा, प्लॅस्टिक व काचेच्या डिश, स्टीलचे डब्बे, फुल पात्री, गाळणी, किसनी, कढई, टॅावेल, नॅपकीन इत्यादी गृहपयोगी वस्तू वाटण्यात आल्या. तसेच प्रत्येक घरात "नेलकटर" देण्यात आलं व त्याचा कसा वापर करायचा याचे प्रात्याक्षीक पण दाखविण्यात आले. तसेच लहान मूलांना खेळण्यासाठी गोट्या व खाऊ म्हणून बिस्कीटे वाटण्यात आली. त्याच सोबत वस्तीवर सेवा परिवाराचे दोन फलक लावण्यात आले.