आगामी उपक्रम
मागोवा
वार्तापत्र र्वूत

मागोवा

गरजूंसाठी मोफत वस्त्र वाटप (२७-१२-२००९)

न्यासातर्फे दि. २७ १२ २००९ रोजी मोफत वस्त्र वाटपाचे कार्य हाती घेण्यात आले. गरीब व गरजू लोक, की ज्यांना घालावयास नीट कपडे नाहीत, अशा लोकांना मदत म्हणून सदर कार्य करण्यात आले. सद्गुरू श्री. काका महाराजांच्या आज्ञेनुसार विश्वस्तांनी सर्व भक्त वर्गास केलेल्या आवाहनाला साद देउन भक्तांनी त्यांचेकडील चांगले कपडे धुवून व ईस्त्री करून न्यासा कडे सुपूर्त केले. श्री. व सौ. मोहीते, (विश्वस्त) यांनी निर्देशित केलेल्या माण (ता. मुळशी, जि. पुणे) या गावी, तेथील गरीब व गरजू लोकांना हे कपडे वाटण्यात आले. तेथे सद्गुरू श्री. काका महाराजांच्या कार्याची माहीती देण्यात आली. कपडे वाटप या कार्याचा तेथील स्त्री, पुरूष व लहान मुले यांनी लाभ घेतला.

प. पू. सद्गुरूनाथ श्री. काका महाराज यांचा जन्मदिवस (दत्त जयंतीच) (३-१२-२००९)

प. पू. सद्गुरूनाथ श्री. काका महाराज यांचा जन्मदिवस (वाढदिवस) म्हणजेच दत्त जयंतीचा दिवस. हा दिवस त्यांच्या सर्व भक्तांसाठी आनंदाचा दिवस. या प्रसंगी श्री. महाराजांच्या प्रति प्रेमभावना आणि शिरसाष्टांग नमन अर्पण करण्यासाठी दै. लोकमत ई. टिव्ही मराठी, या माध्यमा मार्फत मानवंदना प्रसिद्ध करण्यात आली.

गरीब आणि गरजूंनसाठी रक्त तपासणी शिबीर (२२-११-२००९)
प. पू. सद्गुरू श्री काका महाराज यांच्या आशीर्वादानी, कर्वेनगर येथील वडार वस्तीतील गरीब आणि गरजू लोकांसाठी, न्यासातर्फे "अल्प-दरात रक्त तपासणी शिबीराचे" आयोजन करण्यात आले. सुमारे ८० लोकांनी या शिबिरात आपली रक्त तपासणी करून घेतली. कर्वेनगर परिसरातील श्री साईबांबाच्या मंदिरात या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी स्वतः प. पू. सद् गुरू श्री काका महाराजांनी शिबिराला भेट दिली

वृद्धाश्रमात सत्संगाचे आयोजन

गेल्या काही महिन्यांपासून न्यासाने एक नविन, अपूर्व असा उपक्रम हाती घेतला आहे. विविध वृद्धाश्रमातील ज्येष्ठ व्यक्तींसाठी न्यास सत्संगाचे आयोजन करत आहे. पुण्यातील काही सुपरिचित वृद्धाश्रमांमधून हा उपक्रम राबवला जात आहे.

त्या पैकी एक म्हणजे, पर्वती भागातील 'पुणे महिला मंडळ' चालवित असलेले वृद्धाश्रम. यातील ज्येष्ठ महिलांसाठी आठवड्यच्या एका वारी सत्संगाचे आयोजन केले जाते. या सत्संगाला आतिशय चांगला प्रतिसाद आहे. सत्संगात प. पू. सद्गुरू श्री. काका महाराज़ाची शिकवण, त्यांच्या प्रवचना मधील विचार, ज्येष्ठ व्यक्तीं पर्यत पोहोचवून त्यांना आनंद मिळावा व त्याना मानसिक खंबीरता यावी ह्या उदद्त हेतूने न्यास काम करत आहे.

कर्वेनगर येथे मोफत वैद्यकीय चिकित्सा शिबिर (१९/०८/२००९)

प. पू. सद् गुरू श्री काका महाराज यांच्या आशीर्वदानी, कर्वेनगर येथील वडार वस्तीतील गरीब आणि गरजू महिलांसाठी, न्यासातर्फे वैद्यकीय चिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले.कर्वेनगर परिसरातील श्री सांईबाबाच्या मंदिरात या शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराची सुरुवात सद् गुरू श्री काका महाराजांची माहिती व त्यांचे विचार व शिकवण याबद्दल माहिती सांगून झाली. त्या नंतर सुमारे १०० महिलांनी या शिबिरात आपली वैद्यकीय चिकित्सा करून त्याचा लाभ घेतला.

सत्संग प्रचार शिबीर - आळंदी (१३/०६/२००९ - १५/०६/२००९)

प. पू. सद् गुरूनाथ श्री. काका महाराजांच्या सत्संगतील विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ज्येष्ट् महिन्यात आळंदी येथे हे शिबीर आयोजित करण्यात आले. यामध्ये वारकर्‍यांसाठी श्री महाराजांच्या सत्संगच्या सी. डी. ध्वनीक्षेपित करण्यात आल्

वैद्यकीय चिकित्सा शिबिर, आळंदी (२३/०५/२००९)

न्यासाने आयोजित केलेले पाहिले वैद्यकीय चिकित्सा शिबिर यशस्वीरित्या पार पाडले. या मध्ये ४० लोकांनी रक्त तपासणी सेवेचा लाभ घेतला.

गरजूंना मोफत ब्लॅंकेट वाटप

पदपथावर राहणार्‍या अथवा निवारा नसणार्‍या गरीब लोकांमध्ये न्यासातर्फे मोफत ब्लॅंकेट्सचे वाटप करण्यात आले. जेणे करून अशा उपेक्षित लोकांना थंडी वार्‍यापासून संरक्षण मिळाले.

गरीब विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप

होतकरू पण गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना न्यासाने त्यांचे शिक्षण उत्तमरित्या पार पाडण्याच्या हेतूने अलीकडेच चालू वर्षाकारिता मोफत शालेय साहित्याचे वाटप केले, जसे की वहया, पाठ्यपुस्तके, गणवेश, स्टेशनरी ईत्यादि.

दन्त चिकित्सा शिबिर

न्यासाने जगन्नाथ राठी ट्रस्ट च्या मदतीने आळंदीला एका दन्त चिकित्सा शिबिराचे आयोजन केले होते. तोंड, दात व हिरड्या विषयक विकार असणार्‍या बर्‍याच लोकांना या शिबिरातून लाभ झाला