प. पू. सद्गुरूनाथ श्री काका महाराजांच्या ‘अमृतधारा भाग २’ या पुस्तकाची साधक चातकासारखी वाट पहात होते. “मंथन” (अमृतधारा भाग २) या नावाने प. पू. सद्गुरूनाथ श्री काका महाराजांनी, श्री दत्तजयंती दि. २०-१२-२०१० रोजी प्रकाशीत केले. नाम साधना हे मुख्य सूत्र कायम ठेऊन “मंथन” या पुस्तकात श्री काका महाराजांनी प्रश्नोत्तर रूपाने साधकाला साधना मार्गात पडणार्या शंका यावर ओघवत प्रबोधन केले आहे.
श्री सद्गुरूंची अनुभूती म्हणजे काय ? निराशेच्या क्षणावर कशी मात करावी ? कर्मयोग हा भक्तीयोग पेक्षा पुढे आहे कां ? या सारख्य अनेक प्रश्नाची उत्तर दिली आहेत. मंथन चा अभ्यास हा साधकाच्या मनात विचार मंथन सुरू करेल यात शंका नाही. मंथन हे पुस्तक श्री सांई मंदिरात व या संकेत स्थळा व्दारे विक्रीसाठी उपलब्ध आहे.
फणसराई वस्तीचा विकास
दिनांक – ०२-०१-२०११
प. पू. सद्गुरूनाथ श्री काका महाराज सेवापरिवाराच्या सदस्यांनी दि. ०२-०१-२०११ रोजी, डॅा. सूरज नाईक यांच्या सोबत फणसराई वस्तीला भेट दिली. डॅा. सूरज नाईक, बालाजी हॅास्पिटळ, धनकवडी, पूणे यांनी फणसराई व उदेवाडी या दोन्ही वस्तीतील लोकांची मोफत आरोग्य तपासणी केली व मोफत औषध वाटलीत.
या भेटेत उदेवाडी वस्तीतील लहान मूलांना कपडे वाटप करण्यात आले. तसेच फणसराई वस्तीत पदत्रणचे व आंगाचे व कपड्याच्या साबणाचे वाटप करण्यात आले
दिनांक – २६-१२-२०१०
प. पू. सद्गुरूनाथ श्री काका महाराज सेवापरिवाराच्या सदस्यांनी दि. २६-१२-२०१० रोजी फणसराई वस्तीला भेट दिली. तेथिल लोकांना कपबशा, प्लॅस्टिक व काचेच्या डिश, स्टीलचे डब्बे, फुल पात्री, गाळणी, किसनी, कढई, टॅावेल, नॅपकीन इत्यादी गृहपयोगी वस्तू वाटण्यात आल्या. तसेच प्रत्येक घरात "नेलकटर" देण्यात आलं व त्याचा कसा वापर करायचा याचे प्रात्याक्षीक पण दाखविण्यात आले. तसेच लहान मूलांना खेळण्यासाठी गोट्या व खाऊ म्हणून बिस्कीटे वाटण्यात आली. त्याच सोबत वस्तीवर सेवा परिवाराचे दोन फलक लावण्यात आले.
मोफत आरोग्य तपासणी शिबिर, चिटणवीसपूरा नागपूर (२८-१२-२०१०)
प. पू. सद्गुरूनाथ श्री. काका महाराज सेवापरिवाराच्या वतीने महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये गरीब व असहाय्य लोकांना अनेक प्रकारची मदत केली जाते व त्याचाच एक भाग म्हणून दिनांक २८-१२-२०१० रोजी नागपूर येथील महाल – चिटणवीसपूरा येथे मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. सदरील सेवापरिवाराच्या वतीने नागपूर येथे अशा प्रकारचे पहिलेच शिबिर आयोजित केले होते.
सदरील विभागामधील प्रसिध्द फिजिशियन, डॅा. सौ हर्षा वैद्य यांनी डॅा. सौ अश्विनी बुधे यांच्या बरोबर सदरील शिबिरामध्ये १६० पैक्षा अधिक रुग्णांची मोफत वैद्दयकीय तपासणी, रक्त शर्करा, रक्तदाब तपासणी व त्यासंबंधी वैद्यकीय सल्ले दिले.
सदरील शिबिराला महाल विभागातील नागरीकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाल्यामूळे परिवारातर्फे भविष्यात सदरील विभागामध्ये अशाच प्रकारची शिबिरे घेण्याचे ठरविलेले आहे. प. पू. सद्गुरूनाथ श्री. काका महाराज सेवापरिवारा, डॅा. सौ हर्षा वैद्य व डॅा. सौ अश्विनी बुधे यांचे शिबिरासाठी दिलेल्या योगदानासाठी आभार मानत आहे.
प. पू. सद्गुरूनाथ श्री काका महाराजांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून, प. पू. सद्गुरूनाथ श्री काका महाराज सेवा परिवारा तर्फे शुक्रवार दि. ०३-१२-२०१० रोजी सांईनगर, माणिक बाग, सिंहगड पुणे येथील श्री दत्त मंदिरात कान, नाक, घसा तपासणी शिबिर आयोजीत केले गेले. या शिबिरात सुप्रसिध्द कान, नाक, घसा तज्ञ डॅा. सचिन मेहता (MBBS, DLO) आणि त्यांच्या पत्नी सौ. धनश्री मेहता यांनी दु. १० वाजल्यापासून, ११० लोकांच्या कान, नाक, घसा यांच्या विषयींच्या तक्रांरींची तपासणी केली व रुग्णांना अधिक तपासणी करून घणे, शस्त्रक्रिया, श्रवणयंत्र वगैरे विषयी योग्य मार्गदर्शन केले. सुटीचा दिवस नसतांना पण लोकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. शिबिरा बद्दल स्थानिक लोकांनी समाधान व्यक्त केले.
डॅा. सचिन मेहता आणि सौ. धनश्री मेहता यांचे संस्था मनापासून आभार मानते.
कान नाक घसा तपासणी शिबिर, आळंदी (०१-१२-२०१०)
कार्तिक महिन्यातील आळंदी यात्रेचे औचित्य साधून, प. पू. सद्गुरूनाथ श्री काका महाराज सेवा परिवार व जगत क्लिनिक आळदी यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. ०१-१२-२०१० रोजी जगत क्लिनिक आळदी येथे कान, नाक, घसा तपासणी शिबिर आयोजीत केले गेले. या शिबिरात सुप्रसिध्द कान, नाक, घसा तज्ञ डॅा. सचिन मेहता (MBBS, DLO) आणि त्यांच्या पत्नी सौ. धनश्री मेहता यांनी दु. १२ वाजल्यापासून, ९० लोकांच्या कान, नाक, घसा यांच्या विषयींच्या तक्रांरींची तपासणी केली व रुग्णांना अधिक तपासणी करून घणे, शस्त्रक्रिया, श्रवणयंत्र वगैरे विषयी योग्य मार्गदर्शन केले. आळंदी यात्रे मुळे लोकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. तसेच आळंदीला आलेल्या वारक-याना सेवा परिवारातर्फे झंडुबामची बाटली भेट म्हणून देण्यात आली. शिबिरा बद्दल स्थानिक लोकांनी समाधान व्यक्त केले.
डॅा. सचिन मेहता आणि सौ. धनश्री मेहता यांचे संस्था मनापासून आभार मानते.
फणसराई गावाला भेट (२१-११-२०१०)
प. पू. सद्गुरूनाथ श्री काका महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली, प. पू. सद्गुरूनाथ श्री काका महाराज सेवापरिवाराच्या सदस्यांनी पुणे जिल्ह्याती मावळ तालुक्यामधील फणसराई गावाचा विकासाचे कार्य चालू ठेवलेले आहे, व त्याचाच एक भाग म्हणून सेवापरिवाराच्या सदस्यांनी दि. २१-११-२०१० रोजी आपल्या लहान मुलांसहित फणसराई गावास भेट दिली व त्याभेटीमध्ये सदरील गावातील ग्रामस्थांना सेवापरीवाराच्या वतीने दैनंदिन उपयोगाच्या वस्तूंबरोबरच तेल, तुप, मसाल्याचे पदार्थ इत्यादींचे वाटप करण्यात आले.
त्या दिवशी सेवापरिवाराच्या सदस्यांनी संपूर्ण दिवस फणसराई गावातील ग्रामस्थांबरोबर घालविला व ग्रामस्थांबरोबर आपली ओळख करुन त्यांचे प्रश्न, गरजा, अडचणी इत्यादी समजावुन घेतल्या. संस्थेतर्फे गावातील लहान मुलांना चेंडू, तसेच बिस्किट, मिठाई इत्यादी गोष्टी भेट दिल्या, ती पाहून गावातील तरुण व लहान मुले अत्यांनदीत होऊन सदस्यांच्या मुलांबरोबर मनसोक्त खेळली.
सेवापरिवाराच्या वतीने ग्रामस्थांना प. पू. सद्गुरूनाथ श्री काका महाराज यांचे फोटो दिले व श्री काका महाराज यांच्या फोटोची पूजा करण्याचे व त्यांच्यावर श्रध्दा ठेवण्यास सांगितले.
दिवाळी निमीत्य फणसराई गावाला भेट (३१-१०-२०१०)
प. पू. सद्गुरू श्री काका महाराज सेवा परिवार यांनी पुणे जिल्हातील मावळ तालुक्यातील लोणावळा जवळील फणसराई हे गांव दत्तक घेतलेले आहे. या दिवाळीच्या सणानिमित्त प. पू. सद्गुरू श्री काका महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली, सदरील प. पू. सद्गुरू श्री काका महाराज सेवा परिवाराव्दारा फणसराई गावातील नागरीकांना, साबण, कपडे धुण्याची पाऊडर, प्रथमोपचार पेटी, आरसे, सर्व वयोगटातील नागरीकांना घालावयास कपडे, ब्लँकेट्स, चटया इत्यादी दैनंदीन उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.
सदरील वस्तूंव्यतीरीक्त सदरील परीवारा तर्फे दिवाळीसणा निमित्त मिठाई व फराळाचे देखील वाटप करण्यात आले. वास्तविक फणसराई गावामधील नागरीकांना दिवाळी हा सण साजरा करण्यासाठी काहीही नसल्या मुळे त्याना दिवाळी या सणाची तारीख देखील माहीती नव्हती. तथापी सदरील परिवारामधील पदाधिका-यांच्या भेटीमूळे गावातील नागरीकांना सदरील प. पू. सद्गुरू श्री काका महाराज सेवा परिवारा बद्दल आदर वाटू लागला, की ज्यांच्यामुळे गावातील नागरीकांना दिवाळीचा सण साजरा करता आला.
सर्व नागरीकांनी वर उल्लेख केलेल्या कार्यासाठी कपडे, ब्लँकेट्स इत्याद वस्तू दिल्या तसेच ज्या नागरीकांनी देगण्या दिल्या, त्या बद्दल प. पू. सद्गुरू श्री काका महाराज सेवा परिवार आभारी आहे. भविष्यात देखील फणसराई व या सारख्या अनेक परिसरात प. पू. सद्गुरू श्री काका महाराज सेवा परिवार, जीवनावश्यक गोष्टी देऊन मदद करणार आहे.
गरीब आणि गरजूंनसाठी रक्त तपासणी शिबीर (२५-०८-२०१०)
प. पू. सद्गुरू श्री काका महाराज यांच्या आशिर्वदानी, सिंहगड रोड व त्याच्या जवळच्या वस्तीतील गरीब आणि गरजू लोकांसाठी, न्यासातर्फे "अल्प-दरात रक्त तपासणी शिबीराचे" आयोजन करण्यात आले. रक्त तपासणी शिबीरात, रक्तगट, ब्लड शुगर रेन्डम व हिमोग्लोबीन अश्या रक्ताच्या चाचण्या करण्यात आल्य. सुमारे १५० लोकांनी या शिबिरात आपली रक्त तपासणी करून त्याचा लाभ घेतला. सिंहगड परिसरातील सेराजेम वेलनेस सेंटरात या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरा करता डॅा. यशराज पारखी व जगत क्लिनीक यांचे विशेष सहकार्य लाभले.
गरजूंसाठी धान्य, कपडे व वस्तु वाटप (२०-०५-२०१०)
प. पू. सद्गुरूनाथ श्री. काका महाराज सेवा परिवारचे उद्देशांपैकी एक उद्देश म्हणजे, गरीब व गरजू लोकांची सेवा. ज्यांच्या पर्यंत कधीच कोणतीही मदत पोहचत नाही. पुणे परीसरात अशा अनेक वस्त्या आहेत की ज्या शहर-गावांपासून फार दूर आहेत. ज्यांच्या दैनंदिन गरजा देखील पूर्ण होऊ शकत नाहीत.
प. पू. सद् गुरू श्री. काका महाराजांच्या मार्गदर्शनाखाली न्यासाच्या कार्यकर्त्यांनी फणसरांई नावाच्या अशाच एक गावाचा शोध घेतला. फणसराई, हे गाव लोणावळ्या पासून सूमारे १० किलो मीटर दूर आहे व तिथे सूमारे ४० लोकांची वस्ती आहे.
प. पू. सद् गुरूनाथ श्री. काका महाराज सेवा परिवारच्या कार्यकत्यानी, फणसराई या गावातील लोकांना कपडे, धान्य व रोजच्या जीवनात लागणारी काही भांडी, मदत स्वरूपात भेट म्हणून दिल्या.
गरजूंसाठी मोफत नेत्र तपासणी शिबीरा (२८-०२-२०१०)
प. पू. सद्गुरू श्री काका महाराज यांच्या आशीर्वादानी, ठरल्या प्रमाणे दि. २८-०२-२०१० रोजी कर्वेनगर येथील वडार वस्तीत गरीब आणि गरजू लोकांसाठी, न्यासातर्फे "मोफत नेत्र तपासणी शिबीराचे" आयोजन करण्यात आले. सुमारे २०० लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला. कर्वेनगर परिसरातील श्री सांईबांबाच्या मंदिरात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डोळे तपासणी बरोबरच न्यासा तरफे स्वस्तदरात चश्मे सुध्दा उपल्बध करण्यात आले.
या शिबिराला मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे ह्या शीबीराचे आयोजन पुन्हा लवकरच करावे असा निर्णय पण घेण्यात आला. शीबिरासाठी लॉयन्स क्लब व नेत्रतज्ञ डॉ. सौ. वैभवी रावळ ह्यांची मोलाची साथ लाभली.