
Years Experience
Health Camps
plus peoples life touched
Free health clinic
मोफत आरोग्य तपासणी शिबिर, हिवसेवाडा, महाल, नागपूर (०९.०२.२०२०)
मानवसेवा हीच ईश्वरसेवा' हे श्रीसद्गुरूंचे ब्रीदवाक्य स्मरून दिनांक ०५.०२.२०२० रोजी श्रीसद्गुरुंच्या आशीर्वादाने प.पू.सद्गुरुनाथ श्रीकाका महाराज(श्री श्रीपाद अनंत वैद्य ) सेवा परिवारातर्फे पुण्यातील देहू येथे वारकाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर सकाळी १० वाजता सुरू झाले. शिबीरामध्ये एकुण ३८५ वारकऱ्यांची तपासणी करून औषधे देण्यात आली. या शिबिरासाठी या शिबिरासाठी डॉ.प्रल्हाद शिंदे, डॉ.सौ.पल्लवी जोशी - नाफड आणि डॅा. अश्विनी बूधे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
प.पु. सदगुरुनाथ श्री काका महाराज यांच्या कृपेने दि. ०२-०२-२०२० रोजी माले येथिल मुलींच्या वसतिगृहात आरोग्य शिबीर घेण्यात आले. त्यात १०-१५ वयोगटातील ७२ मुलामुलींची आरोग्य तपासणी करून औषधे देण्यात आली. या शिबीरासाठी डॉ. सौ. पल्लवी जोशी - निफाड व सौ. अश्वीनी बूधे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
मानवसेवा हीच ईश्वरसेवा या ब्रीदवाक्याला अनुसरून प.पू.सद्गुरूनाथ श्रीकाका महाराज सेवा परिवाराच्या वतीने, दि. ११.०१.२०२० रोजी , विंझाई हायस्कूल , ताम्हिणी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा स्थानिक तसेच शाळेतील मूलानी लाभ घेतला. सकाळी १० वाजल्यापासून शिबिराला सुरुवात झाली. सुमारे २०० लोकांनी या सेवेचा लाभ घेतला. डॅा. अश्विनी बूधे यांचे संस्था मनापासून आभार मानते.
प.पू.सद्गुरू श्रीकाका महाराज म्हणतात, दुस-याच्या चेह-यावरचा आनंद बघून जो आनंद होतो तोच खरा आनंद असतो. प.पू श्रीकाका महाराजांच्या या शिकवणीतूनच दर वर्षी विविध वृध्दाश्रमांतून, अनाथाश्रमातून संक्रांत सणां निमीत्य, संस्थेतर्फे तिळगुळ, वितरण करून सर्वांबरोबर आनंद साजरा करण्यात येतो. या वर्षीही, म्हणजे २०२० च्या मकरसंक्रांतीला पुणे, चापडी, फणसराई, नागपूर व मुंबई इ. विविध वृध्दाश्रमांतून, अनाथाश्रमातून तिळगुळ वाटपा सोबत धान्य, सायकली, दिन-दर्शीका ई. वस्तूंचे वितरण करण्यात आले व सर्वांसह संक्रांतीचा आनंद साजरा करण्यात आला. याशिवाय, जिथे जिथे संस्थेतर्फे प.पू.श्रीकाका महाराजांचा सत्संग चालविण्यात येतो तिथेही तिळगुळ वाटप करण्यात आले.