सत्संगामध्ये , लोकांच्या प्रापंचिक आणि आध्यात्मिक शंकांचे निराकरण करताना प. पू. सद्गुरूनाथ श्रीकाका महाराज जे मौलिक विचार मांड्त असतात , त्यातील काही विचार पुस्तकरूपानी , ’अम्रुतधारा – भाग १’ मधून प्रकाशित केले आहेत. हे पुस्तक श्रीकाका महाराजांनी स्वतः लिहिले असून ते मराठी भाषेत आहे. ’नामसाधना व सद्गुरू तत्व’ हा या पुस्तकातील मुख्य धागा अहे.
( हे पुस्तक इंग्रजी , हिंदी , तेलुगु इ. भाषांमधेही उपलब्ध आहे. )
त्याचबरोबर , श्रीकाका महाराजांनी सत्संगात सांगितलेल्या मौलिक व प्रेरणादायी विचारांना संकलित करून , त्यांना पुस्तकरूपात शब्दबध्द करण्यात आलं आहे. श्रीकाका महाराजांचे विचार या पुस्तकांत प्रश्नोत्तरांच्या माध्यमात असून , ’मंथन – अम्रुतधारा भाग २ , भाग ३ , भाग ४’ इत्यादी ३ भागांत ही पुस्तके उपलब्ध आहेत. तसेच ’भाग ५’ चे काम सुरु आहे.
असे म्हणतात , अम्रुताचे प्राशन केल्याने अमरत्व प्राप्त होते. प. पू. श्रीकाका महाराजांचे अम्रुतमय विचारही निराश , दुःखी , मरगळलेल्या मनांना नवसंजीवनी देण्याचे कार्य करतात. श्रीमहाराजांच्या अनमोल विचाररूपी अम्रुताची ही अविरत धारा आपल्याला अजर , अमर अशा सद्गुरू तत्वापर्यंत नेण्याचे कार्य करते , आपल्या आयुष्यात समाधान व मनःशांती आणते , भयमुक्त व खंबीर जीवन प्रदान करते.
या पुस्तकांमधून , नाम म्हणजे काय , नाम घेण्यासाठी काय पात्रता लागते , नामस्मरणानी आपल्यावर काय परिणाम होतो इत्यादी नामसाधकाला पडणा-या अनेक प्रश्नांचे निराकरण केले आहे. श्रीकाका महाराजांनी , “नाम आणि सद्गुरू ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत” असं सांगताना नामसाधनेत सत्संगाचे महत्व , सद्गुरूंचे अनन्यसाधारण महात्म्य , सद्गुरूंशी अखंड अनुसंधान इत्यादी गोष्टींचे विवेचन केले आहे. याबरोबरच , दैनंदिन जीवनात माणसाचं वर्तन कसं असावं , मनाची शांती कशी प्राप्त करता येईल , आजच्या तणावग्रस्त जीवनात मन खंबीर आणि निर्भय कसं होईल , तसेच जुन्या - जाचक रूढी – परंपरांचा बागुलबुवा का व कसा दूर केला पाहिजे इत्यादी दैनंदिन जीवनातील मुद्द्यांवरही मार्गदर्शन केलं आहे. नामसाधकांसह सर्वांसाठीच ’मंथन – अम्रुतधारा’ ची ही सर्व पुस्तके अतिशय उपयुक्त व मार्गदर्शक आहेत.
प. पू. श्रीकाका महाराज नेहमी म्हणतात की , “अम्रुतधारा हे पुस्तक एखाद्या कादंबरीप्रमाणे , एका बैठकीत वाचण्याचे नसून , त्यातील प्रत्येक प्रकरणाचे सतत चिंतन व मनन केल्याने दर वेळेस ते नव्याने कळत जाईल आणि त्यातला विषय अधिकाधिक उलगडत जाईल.” श्रीकाका महाराज असेही सांगतात की , “तुमच्या मनात निर्माण होणा-या कोणत्याही प्रश्नाला ’अम्रुतधारा’ नक्कीच उत्तर देईल. तुम्ही एखादा प्रश्न मनात धरून डोळे मिटा आणि आपल्या आत असलेल्या सद्गुरूंना तो प्रश्न विचारा , नंतर अम्रुतधारातलं कोणतंही पान उघडून त्यात सांगितलेल्या विचारांचे प्रामाणिकपणे चिंतन व मंथन केलंत तर नक्की तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सापडेल.”
सत्संग हा शब्द सतç आणि संग या दोन शब्दांपासून तयार झाला आहे. सतç म्ह्णजे सत्य (शाश्वत सत्य) आणि संग म्हणजे संगती , सख्य , सहवास. हिंदू तत्वज्ञानानुसार प्रत्येक सजीवात आणि निर्जीवात ईश्वर चैतन्य रूपाने वास करतो आणि ते चैतन्य हेच एकमेव असं चिरंतन , शाश्वत सत्य आहे. सद्गुरूपदाला पोचलेल्या व्यक्ती ह्या अशा व्यक्ती असतात ज्यांना त्यांच्यातल्या चैतन्यरूपी ईश्वराची ओळख झालेली असते , म्हणजेच शाश्वत आनंदाची ओळख झालेली असते. या शाश्वत आनंदाची ओळख केवळ सद्गुरूच आपल्यालाही करून देऊ शकतात. केवळ सद्गुरूच त्या चैतन्यरूपी ईश्वराची अनुभूति आपल्याला देऊ शकतात. पण त्यासाठी सद्गुरूंच्या सत्संगाची कास धरणे अत्यंत आवश्यक आहे. सत्संग म्हणजे सद्गुरूंच्या शिकवणीचा अंगीकार करून , सद्गुरूंच्या विचारांचे सतत मनन करून , प्रत्यक्ष सद्गुरूंचं अखंड चिंतन करून , सद्गुरूंच्या सहवासात राहणे आणि त्यांच्या शिकवणीनुसार आचरण करणे.
प. पू. सद्गुरूनाथ श्रीकाका महाराजांच्या सांईमंदिरात दर मंगळवारी सत्संगाचे आयोजन केले जाते. समाजातल्या विविध स्तरातील लोक या सत्संगात सहभागी होतात. विविध संस्क्रुतींचे , विविध जाती-धर्मांचे , विविध पंथांचे लोक श्रीकाका महाराजांचे अनुयायी आहेत. स्वतः श्रीकाका महाराज भक्तांना मार्गदर्शन करतात. सत्संगात सहभागी होणा-या भक्तांना / साधकांनाही आपले विचार मांडण्यासाठी श्रीकाका महाराज उद्युक्त करतात , प्रोत्साहन देतात. अगदी युवा वर्गापासून व्रुध्दांपर्यंत कोणीही आपले विचार मोकळेपणानी सत्संगात मांडू शकतात हे इथल्या सत्संगाचं एक अतिशय महत्वाचं वैशीष्ट्य आहे आणि हेच या सत्संगाचं वेगळेपणही आहे.
श्रीकाका महाराज म्हणतात , “सद्गुरू हेच ईश्वर आहेत आणि हे सद्गुरू तत्व प्रत्येकाच्या ह्रदयात वास करून असतं. ज्यांना त्यांच्यातल्या सद्गुरू तत्वाची ओळख झालेली आहे अशा सद्गुरूपदाला पोचलेल्या व्यक्ती ह्या नश्वर किंवा अशाश्वत असतात , पण त्यांच्या आत वास करणारं तत्व शाश्वत , चिरंतन असतं. भगवंताचं अखंड नामस्मरण , हा आपल्यातील सद्गुरू तत्वाची ओळख करून घेण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे.” श्रीकाका महाराज नामसाधनेचे महत्व सांगताना म्हणतात , “नाम घ्यायला वेळ-काळ , जात-पात , गरीब-श्रीमंत , स्त्री-पुरुष , उच्च-नीच , लहान-मोठा इत्यादी कसलेही बंधन नाही. कोणालाही आणि कधीही नामस्मरण करता येते. रोजची व्यावहारिक कामे करतानाही नाम घेता येते. फक्त नाम हे प्रेमानी , सद्गुरूंच्या अखंड अनुसंधानात आणि नामाला कंटाळा येईपर्यंत घेतले पाहिजे. ”
’नामसाधना आणि सद्गुरू तत्व’ हे सूत्र केंद्रस्थानी ठेवून , दैंनंदिन व्यवहारातील उदाहरणं देऊन , अतिशय साध्या-सोप्या शब्दांत , आपल्या रसाळ वाणीतून श्रीकाका महाराज सत्संगात प्रबोधन करतात. श्रीकाका महाराज नेहमी असं म्हणतात की , “आपला देह हा – प्रुथ्वी , आप , तेज , जल , वायु या पंचमहाभूतांचा बनला आहे. या देहाबरोबर येणारे भोग , संकटं , निर्माण होणा-या समस्या , प्रश्न हे देखील या पाच तत्वांमधून निर्माण होतात. या प्रश्नांवर , संकटांवर मात करण्यासाठी लागणारी शक्ती , योजावे लागणारे उपायही याच पाच तत्वांमधून प्राप्त होतात. त्याचबरोबर , ही शक्ती आणि उपायांची आपल्याला ओळख करून देणरे जे सद्गुरू तत्व आहे ते तत्वही याच पाच तत्वांमधे वास करून असतं. म्हणूनच प्रत्येकानी स्वतःमधल्या या मूळ सद्गुरू तत्वाची ओळख करून घेतली पाहिजे. म्हणजेच प्रत्येकानी स्वतःमधल्या त्या चैतन्यरूपी ईश्वरापर्यंत जाण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.”
आणि यासाठीच , सत्संगात श्रीकाका महाराज नामसाधनेचे महत्व अतिशय तळमळीने पटवून देतात. नामस्मरणाबरोबरच , सद्गुरूंच्या शिकवणीचा अंगीकार करून , त्यानुसार आचरण करून आजच्या धकाधकीच्या , तणावपूर्ण जीवनशैलीतही माणूस निर्भीड , आनंदी , समाधानी होऊ शकतो , हे अतिशय आग्रहाने सांगताना श्रीकाका महाराज म्हणतात , “केवळ सद्गुरूंचा सत्संग आणि अखंड नामस्मरणानीच माणूस भयमुक्त होऊन चिरंतन आनंद व समाधान मिळवू शकतो.”
श्रीकाका महाराजांच्या ओघवत्या , रसाळ वाणीतले त्यांचे सकारात्मक व संजीवक विचार ऐकणे आणि या सत्संगात सहभागी होणे हा एक अपूर्व आनंदाचा अनुभव असतो.
पुस्तके :-
- अम्रुतधारा – भाग १ ( मराठी , हिंदी , इंग्रजी )
- मंथन - अम्रुतधारा – भाग २
- मंथन - अम्रुतधारा – भाग ३
मंथन - अम्रुतधारा – भाग ४
- मंथन - अम्रुतधारा – भाग ५
- आरती पुस्तक नित्यपाठ – प. पू. श्रीकाका महाराजांवर रचलेल्या १०८ ओव्यांचे पुस्तक :- लेखक – श्री. पिनाक तेंडुलकर.
- नित्योपासना - प. पू. श्रीकाका महाराजांवर रचलेल्या दैनंदिन उपासनेचे पुस्तक :- लेखिका- मेघना वैद्य.
- अष्टोत्तर शतनामावली - प. पू. श्रीकाका महाराजांवर रचलेले १०८ नामस्वरूप गुणगौरव पुस्तक :- लोखिका – सौ. रेखा देवळणकर.
- भावपूजा - प. पू. श्रीकाका महाराजांवर रचलेले भावकाव्य व गीते यांचा संग्रह :- लेखिका – सौ. लिलावती मोहिते.
सी.डी :-
सोमवार आरती सी.डी. (प.पू.श्रीकाका महाराजांच्या सांईमंदिरातील सोमवारची आरती)
गुरुवार आरती सी.डी. (प.पू.श्रीकाका महाराजांच्या सांईमंदिरातील गुरुवारची आरती)
नित्योपासना सी.डी. (प.पू.श्रीकाका महाराजांवर रचलेली दैनंदिन उपासना)
जप सी.डी. :
1. हरि Á , श्रीराम जय राम
2. Á नमो भगवते वासुदेवाय , आईजगदंबे आंबाबाई
3. जय जय संतश्रेष्ठ शिवस्वरूप काका महाराज
4. Á नमो सद्गुरू जय जय मुरलीधर बाबा
सत्संग (प.पू.श्रीकाका महाराजांच्या प्रवचनांचे ध्वनीमुद्रण)
१. प्राप्त परीस्थीतीत आनंदी व नीर्भीड राहण्याचा मार्ग
२. सर्व सामान्य माणूस व नाम साधना
३. श्रीसद्गुरूं चे छञ व आपण
४. जन्म, मृत्यू वीषयी पडलेला प्रश्न व नाम साधना
५. आपले व्यहवारीक प्रश्न, श्रीसद्गुरूंचे आश्वासन व नाम साधना
६. श्रीसद्गुरूंचे अनूकरण व आपण
७. आपले रोजचे जीवन व श्रीसद्गुरूं - भाग १
८. आपले रोजचे जीवन व श्रीसद्गुरूं - भाग २
९. नामसाधनेचे ऊद्देश्य व नामा वरील प्रेम
१०. कर्ममार्ग आपली जाणिव व श्रीसद्गुरू
११. आपल्या बाह्य मनाची शूध्दी व श्रीसद्गुरू
१२. आपल्यातल्या ईश्वराचा वास, आपल्या वासना व श्रीसद्गुरू
१३. आपल्या योग्य ईच्छा, वर्तन व सर्व-साक्षी श्रीसद्गुरू
१४. आपल्या बरोबर असलेले श्रीसद्गुरू नामस्मरण व आपण
१५. श्रीसद्गुरू व ईश्वर एकाच नाण्याच्या दोन बाजू
१६. सात कोषाच्या आंत असलेले आपले मूळ श्रीसद्गुरू स्वरूप
१७. श्रीसद्गुरूची एकरूपता व नामसाधना
१८. भक्ताच्या आधीन असलेले श्रीसद्गुरू व आपण
१९. श्रीसद्गुरूंची सत्ता व आपण
२०. आपल्या वरील संकट व श्रीसद्गुरूं वरील वीश्वास
२१. भक्ती मार्गात श्रीसद्गुरूंचे स्थान
२२. आपल्या आंत बसलेल्या श्रीसद्गुरूंचा आवज व नामसाधना
२३. आपली प्रगती व श्रीसद्गुरू
२४. श्रीसद्गुरूंचे अनूभव, अनूभूती व आपण
२५. सूक्ष्म स्वरूपातील श्रीसद्गुरूंची जाणिव व नामसाधना
२६. संत आणि श्रीसद्गुरूंचे कार्य व आपण
२७. भक्ती कशी करावी
२८. श्रीसद्गुरूंच्या आधीन होणे म्हणजे काय ?
२९. श्रीसद्गुरूंचे देणे व आपण
३०. श्रीसद्गुरूंच्या अनूभूतीची समज व आपण
सत्संग डी.व्ही.डी.
(प.पू.श्रीकाका महाराजांच्या प्रवचनांचे ध्वनीचित्रमुद्रण)
१. श्रीसद्गुरू कोणाचे... सर्वांचे
२. अंतर्मनातल्या आनंदस्वरूप सद्गुरूंची जाणीव, आपली समज आणि मनाची अवस्था
३. अध्यात्म मार्गात नामसधने बरोबरच सत्संगाचे महात्म्य
४. श्रीगुरूपौर्णिमा ... श्रीसद्गुरूंच्या जाणिवेतून
५. भक्ती ... श्रीसद्गुरूंच्या जाणिवेतून
६. आपल्या जीवनातील खर्या रामाची जाणिव व श्रीसद्गुरू
७. जीवात्मा, परमात्मा... आपली समज व खरी ओळख
८. श्रीसद्गुरूंची कृपा व आपली समज
९. वियोग श्रीसद्गुरूंचा
१०. आपल्याला चीकटलेले दोष... आपण व श्रीसद्गुरू
११. श्रीसद्गुरूंना बरोबर घेऊन सर्व कार्य करण्याचा संकल्प ... अक्षय्यतृतीया २०१५
१२. सत्य - असत्य - अर्धसत्य, श्रीसद्गुरू व आपण
१३. रूढी परंपरा, देवतार्चन, व्रतवैकल्य, वगैरे विषयी श्रीसद्गुरूंच्या दृष्टीकोनाचा स्वीकार व आपण
१४. कामातील नामाचा शोध, आपण व श्रीसद्गुरू
टीप
1. मंथन – अम्रुतधाराचे सर्व भाग , तसेच इतर सर्व पुस्तकांची संपूर्ण मालकी आणि वितरणाचे अधिकार व हक्क हे सर्वस्वी कु. मेघना श्रीपाद वैद्य यांच्याकडे आहेत.
2. सत्संग , आरती , जप , नित्योपासना इ. सर्व सी.डी. व सत्संग डी.व्ही.डी. यांची संपूर्ण मालकी आणि वितरणाचे अधिकार हे सर्वस्वी कु. मेघना श्रीपाद वैद्य यांचे आहेत.
3. न्यास हा फक्त येथे खरेदी करणा-यांसाठी एक सुविधाधारक म्हणून सदर विक्री करत आहे. न्यासातर्फे येथे नमूद करण्यात येत आहे की , वरील कोणत्याही साहित्यावर न्यासाची मालकी व वितरणाचा अधिकार , हक्क नाही.