आधार


आजच्या गतिशील काळात माणसाला माणसासाठी वेळ नाही. सोशल नेट्वर्किंग साईट्सवर जोडलेला असणारा माणूस कौटुंबिक नातेसंबंधाना दुरावत चालला आहे . कौटुंबिक जीव्हाळल्याला पारख्या झालेल्या अशा वृद्ध नागरिकांना आयुष्याच्या संध्याकाळी जीवन जगण्यासाठी मानसिक बळ मिळावं प्राप्त परिस्थितीला त्यांनी खंबीरपणे सामोरं जावं या हेतूने विविध वृद्धाश्रमांमधुन संस्था सत्संगाचे आयोजन करत आहे . प .पू श्री काका महाराजांच्या सकारात्मक विचारांनी त्यांच्या निराश मनांना उभारी मिळावी यासाठी संस्था सतत प्रयत्नशील आहे .

 

मकर संक्रांतीला तिळगुळ आणि दिवाळीला फराळ आणि भेटवस्तूंसह सणाचा आनंद या आजी आजोबांबरोबर साजरा केला जातो . त्याचप्रमाणे प्राथमिक आरोग्य तपासणी शिबीरांमधून त्यांच्या दुखल्या खुपल्याची आस्थेने विचारपूस केली जाते . या आजी आजोबांच्या वृद्ध नागरिकांच्या रडणाऱ्या मनांना श्री महाराजांच्या अमृतवाणीनी मायेचा ओलावा देऊन मानसिक आधार देण्याचं कार्य संस्था करत आहे .

सावली


जीवन जगण्यासाठी अनिवार्य असणाऱ्या अन्न वस्त्र निवारा या प्राथमिक गरजा पण समाजातल्या काही वंचित व मागास भागातील लोकांच्या या प्राथमिक गरजाही पूर्ण होऊ शकत नाही . अशा गरजू लोकांना धान्य व जीवनावश्यक वस्तूंची मदत तसेच कपडेवाटपही संस्था वेळोवेळी करत आहे . त्याचप्रमाणे या लोकांना प्राथमिक आरोग्य तपासणीची सुविधाही संस्थेतर्फे उपलब्ध करून दिली जाते.

याच उपांतर्गत लोणावळा याजवळील फणसराई या आदिवासी पाड्यातील ७ कुटुंबांना संस्थेनी पत्र्याचे छप्पर असलेली पक्की घरे बांधून दिली आहेत . तसेच बेळगाव इथल्या 'उत्थान" या देवदासी मुलींच्या आश्रमालाही संस्था वेळोवेळी मदत करत आहे .

समाजाचंच एक अंग असलेल्या पण समाजापासून दूर राहिलेल्या या घटकाला काही अंशी दिलासा देण्याच कार्य संस्था करत आहे .

दिलासा


भौतिकवाद आणि चंगळवाद प्राबल्य असलेल्या या विज्ञानयुगात मानसिक स्वास्थ्य आणि समाधान या दोन सर्वात महत्वाच्या गोष्टींचा अभाव आहे . आजच्या तणावग्रस्त परिस्थितीत आनंदी व निर्भीड जीवन कसं जगायच तसेच कोणत्याही कर्मकांडाशिवाय केवळ नामसाधानेनी मनाची शांती आणि स्थैर्य कसं प्राप्त करायचं याविषयी प.पू श्री काका महाराज गेली कित्येक वर्ष सत्संगातून लोकांना मार्गदर्शन करत आहेत . जाचक रूढी परंपरांमध्ये व अंधश्रध्देमध्ये अडकलेल्या भयग्रस्त लोकांना बाहेर काढण्यासाठी सातात्यानी प्रोबधन करत आहेत .

 

 

श्री महाराजांचे संजीवक व सकारात्मक विचार समाजातल्या जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी संस्था विविध ठिकाणी सत्संगाचे आयोजन करत आहे . त्याचबरोबर श्रीमहाराजांच्या विचारधारेवर आधारित असलेल्या श्रीमहाराजांच्या भक्तांच्या क्र अनुयायांच्या लेखण्यांमधून साकार झालेल्या ' अंतरंग ' या अंकाचं प्रकाशनही संस्था करत आहे

 

विषम परिस्थितीच्या अंधकारनी मरगळलेल्या निराश मनांना श्रीमहाराजांच्या तेजस्वी विचारांच्या जीवनज्योतीने प्रदीप्त क्र प्रज्वलित क्र प्रकाशमान करण्याचं कार्य संस्था करत आहे .

जीवनज्योत


स्वतः उच्च विद्याविभूषित असलेले प. पू श्री काका महाराज लोकांना शिक्षणाचं महत्व अतिशय तळमळिनी पटवून सांगत असतात . ते म्हणतात , "प्रत्येकानी शेवटपर्यंत विद्यार्थीदशेत राहिलं पाहिजे . प्रत्येक व्यक्तींनी शिकलं पाहिजे , शिक्षण हा आजच्या काळातला मनुष्याचा तिसरा डोळा आहे ."

 

त्यांच्याच प्रेरणेनी गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी संस्था मदतीचा हात देत असते. या उपांतर्गत दर वर्षी गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणिक साहित्य मोफत प्रदान करण्यात येतं . याव्यतिरिक्त ग्रामीण भागातल्या गरजू शाळांना व वसतीगृहांना दर महा धान्य भाजीपाला व ईतर जीवनावश्यक वस्तूंची मदत संस्था करत असते . तसेच या शाळांमधून व वसतीगृहांमधून वैद्यकीय तपासणीच शिबिरांचं आयोजनही वेळोवेळी करण्यात येतं .

 

कठीण परिस्थितीतही जिदीने शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिकूल परिस्थितीचे चटके बसू नयेत यासाठी त्यांना मदतीची सावली देण्याचं कार्य संस्था करत आहे .

Gallery