English | मराठी
आगामी उपक्रम
मागोवा
वार्तापत्र र्वूत

मागोवा

 

 

E - कचरा संकलन उपक्रम, पूणे  (३१-०८-२०१६)

विज्ञान-तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे देशात ई-कचर्‍याचे प्रमाण वेगाने वाढत आहे. विशेषत: शहरी भागात या कचर्‍याची समस्या मोठय़ा प्रमाणात जाणवत आहे. त्यातही ई-कचर्‍याच्या निर्मितीत महाराष्ट्राने आघाडी घेतली असून हे सर्वाधिक ई-कचरा निर्मिती करणारे देशात पहिले राज्य ठरले आहे. ई-कचर्‍याबाबत जनजागृती करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी सोसायट्या, आयटी सेंटर, औद्योगिक परिसर आणि खासगी कंपन्यांमध्ये जाणीवजागृती करण्याचा उपक्रम सुरू केला आहे.

दि. ३१.०८.२०१६, सकाळी संस्थेतर्फे, सिंहगड रस्त्यावरील चार सोसायट्यांमध्ये 'E - कचरा संकलन उपक्रम' आयोजण्यात आला व तो उत्साहात पार पडला. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद लाभला. आपल्या संस्थेचे सदस्य श्री.सणस काका यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला. हा उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात त्यांचा मोठा सहभाग आहे.


 

वारकर बंधू भगीनींन करीता मोफत आरोग्य तपासणी शिबिर, बिबवेवाडी, पूणे  (२९-०६-२०१६)

दि. २९-०६-२०१६ रोजी प. पू. सद्गुरूनाथ श्री काका महाराज सेवा परिवार, पूणे यांच्या वतीने बिबवेवाडी येथील यशवंतराव चव्हान शाळेमध्ये मुक्कामी असलेल्या – श्री संत श्रेष्ट जगद्गुरू तुकाराम महाराज संस्थान  सोनखेड व परिसर, वारकरी बंधू भगीनींची तज्ञ डाक्टरांकडून आरोग्य तपासणी करून मोफत औषध वाटप करण्यात आले.

डॉ. प्रल्हाद शिंदे, डॉ.पल्लवी डफळ, डॉ . सतिश कळसकर, डॉ . अश्विनी बूधे, डॉ.दिपक शिंदे, डॉ.सूरज नाईक, व डॉ.नीना नाईक आणि त्यांचे सहकारी यांनी आपले महत्वाचे योगदान दिले. या प्रसंगी सेवा परिवाराचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी १० ते दु. ४ या वेळात ६५०  वार री बंधू भगीनींनी याचा लाभ घेतला.

 

हस्तकला शिबीर, नागपूरी (०९-०६-२०१६)

ऊन्हाळ्याच्या सुट्टी निमीत्य, प. पू. सद्गुरूनाथ श्रीकाका महाराज सेवा परीवार नागपूर शाखेने, वाल्मिकी बाल गृह येथे, हस्तकला शिबीर घेतले. यात लहान मुलांनी आकाश कंदील, ग्रिटिंग कार्ड व कॅन्ड तयार करायला शिकवण्यात आल्या.

या शिबीरासाठी अंजली लाबडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच संस्थे कडून सर्व मूलांना ह्या वस्तू तयार करण्याचे किट वाटण्यात आले.

 

 

कपडे वाटप- फणसराई व उदेवाडी (२३-०४-२०१६) 

प.पू.सद्गुरूनाथ श्रीकाका महाराजांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेनी लोणावळ्याजवळील फणसराई व उदेवाडी या आदिवासी वस्त्यांच्या विकासाचं काम हाती घेतलं आहे. संस्थेचे सभासद नियमितपणे तिथे भेट देऊन तिथल्या लोकांना शक्य ती मदत देत असतात.

दि. २३-०४-२०१६ रोजी संस्थेच्या काही सभासदांनी फणसराई व उदेवाडी या दोन्ही वस्त्यांना भेट दिली. तिथल्या आदिवासी लोकांना कपडे व धान्य वाटप करण्यात आले. तसेच लहान मुलांना गोळ्यांची पाकीटे, बिस्कीटांचे पुडे इ. खाऊ वाटण्यात आला. त्या लोकांबरोबर चहापान करून व त्यांच्याशी संवाद साधून सर्वांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व शक्य त्या मदतीचे आश्चासन दिले.

 

मोफत आरोग्य तपासणी शिबिर, अमृतनाथ स्वामी महाराज आश्रम, आळंदी (१४-०२-२०१६)

 

मानवसेवा हीच ईश्वरसेवा या ब्रीदवाक्याला अनुसरून प.पू.सद्गुरूनाथ श्रीकाका महाराज सेवा परिवाराच्या वतीने, दि. १४-०२-२०१६ रोजी, अमृतनाथ स्वामी महाराज आश्रम, चाकण रोड, आळंदी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास स्थानिक तसेच एकादशीच्या निमित्ताने आळंदीला आलेल्या वारकर्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.

सकाळी १० वाजल्यापासून शिबिराला सुरुवात झाली. सुमारे ३५० लोकांनी या सेवेचा लाभ घेतला. शिबिरार्थींना, प.पू. श्रीकाका महाराजांच्या सत्संगा वर रचलेले मंथन पुस्तकाचे वाटपही करण्यात आले.

मोफत आरोग्य तपासणी शिबिर – ’ माझे माहे मुलींचे वसतीग्रुह , मुंबई ( १४-०२-२०१६)

 

आपल्या कार्याच्या कक्षा रुंदावताना , संस्थेनी परत मुंबईत एका आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलं. ’माझे माहेर’ या मुंबईतल्या अनाथ मुलींच्या वसतीग्रुहात हे शिबिर घेण्यात आलं. या शिबिरात सर्व औषधांचे मोफत वाटप  करण्यात आले. या शिबिरात १०० मुलं व मुलींची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. डा. अश्विनी बुधे यांनी बहुमूल्य योगदान दिले.

मोफत आरोग्य तपासणी व रक्त्दान शिबिर नागपूर (०७-०२-२०१६)

 

 

मकर संक्रत साजरा, पूणे व नागपूर (२०१६)

 

’मानवसेवा हीच ईश्वरसेवा’ हे ब्रीद असणारे प. पू. सद्गुरूनाथ श्रीकाका महाराज नेहमी सांगतात की , “ दुस-याच्या चेह-यावरचा आनंद पाहून आपल्याला आनंद झाला पाहिजे. प्रत्येकानी स्वतःबरोबर दुस-याचाही विचार केला पहिजे.” त्यांच्या या शिकवणीनुसार आणि त्यांच्याच प्रेरणेने व प्रोत्साहनाने मकर संक्रांत आणि दीपावली या दोन सणांना संस्थेतर्फे विविध ठिकाणी तीळगुळ आणि दिवाळी फराळ तसेच भेटवस्तू यांचं वाटप केलं जातं. या वर्षीही मकर संक्रातीच्या निमित्ताने सेवापरिवारातर्फे तिळगुळ व प.पू.श्रीकाका महराजांचा संदेश असलेल्या शुभेच्छापत्रांचे वाटप करण्यात आले. या शुभेच्छापत्रांचे वैशीष्ट्य म्हणजे त्यावर प.पू.श्रीकाका महाराजांच्या संदेशासह त्यांची स्वाक्षरी आहे…!!

संस्थेतर्फे पुण्यात, नागपूरमधे व नांदेड इथे ज्या ज्या ठिकाणी सत्संगाचे आयोजन केले जाते त्या प्रत्येक ठिकाणी, आणि त्याव्यतिरिक्त खालील ठिकाणी हे वाटप करण्यात आले.

“ तिळगुळ घ्या, गोड बोला ” असे म्हणून ,’ जय सांईराम ’ या परवलीच्या शब्दानी या तिळगुळ वाटपाचा आनंद सर्वांबरोबर वाटण्यात आला.