English | मराठी
आगामी उपक्रम
मागोवा
वार्तापत्र र्वूत

मागोवा

 

 

 

अक्षर स्पर्श मतिमंद व अपंग विद्यार्थ्यां साठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर (२७-०६-२०१७)
अक्षर स्पर्श मतिमंद व अपंग विद्यार्थ्यां साठी काम करणारी सरकार मान्य संस्था धनकवडी पुणे येथे आहे. परंतु त्यांना Government Aid मिळत नाही. २७-०६-२०१७ रोजी, या शाळेत 16 विद्यार्थी, तसेच ४ स्टाफ यांच्या साठी मोफत आरोग्य तपासणि शिबीराचे आयोजन करण्यात आले. संस्थेने घेतलेले शिबीर फारच उपयोगी ठरले. दर ३ महिन्यांनी शिबीर घेण्याचा संस्थेचा नीर्धार आहे.

 

वारक-यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर (१९-०६-२०१७)

 

टाळ-मृदुंगाच्या साथीने, 'जय जय रामकृष्णहरि' च्या नामघोषात, ऊन-पाऊस-वारा कशाचीही तमा न बाळगता लाखो वारकरी दरवर्षी श्रीविठ्ठलाच्या ओढीने पंढरपूरी जातात. या वारक-यांची काही अल्प सेवा करता यावी या उद्देशाने दर वर्षी संस्थेतर्फे एक मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येते.

या वर्षी दि. 19 जून 2027 ला बिबवेवाडी येथे, नांदेडहून आलेल्या वारक-यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात 500 वारक-यांची मोफत तपासणी करण्यात आली. सर्वांना मोफत औषधे देण्यात आली.

अत्यंत शिस्तबद्ध आणि भक्तीमय वातावरणात हे शिबिर संपन्न झालं. शिबिरात रांगेत उभ्या असलेल्या वारक-यांनी उत्स्फूर्तपणे 'ज्ञानोबा माउली तुकाराम' चा नामघोष करत वातावरण भक्तीमय केले.

सर्व वारक-यांना , प.पू.सद्गुरू श्रीकाका महाराजांनी लिहिलेली मंथन- अमृतधारा ही पुस्तकांचे , तसेच प.पू.श्रीकाका महाराजांवर रचलेले नित्यपाठांचे वाटप करण्यात आले.

या शिबिरासाठी डॉ. अश्विनी बुधे. डॉ. प्रल्हाद शिंदे, डॉ. सौ. शिंदे, डॉ. राणे, डॉ. सौ. नाईक यांचे मोलाचे योगदान लाभले.

मोफत आरोग्य तपासणी व रक्त्दान शिबिर नागपूर (२६-०१-२०१७)

 


'प.पू.सद्गुरूनाथ श्रीकाका महाराज (श्री. श्रीपाद अनंत वैद्य) सेवा परिवार'  व बारई समाज, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर येथे एक बहुतपासण्या असलेले आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन स्वतः प.पू.श्रीकाका महाराज यांच्या शुभहस्ते झाले.

या शिबिरात सुमारे 300 रुग्णांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.

या शिबिरासाठी डॉ. चिराग भोज, डॉ. नेहा लाबडे, डॉ. समीक्षा सहारे, डॉ. आयुषी वैद्य, डॉ. शैलेश कोठारकर, डॉ. विजयलक्ष्मी कोठारकर, डॉ. मोहन नाटेकर, डॉ. हर्षा वैद्य, डॉ. अश्विनी बुधे या सर्वांचे बहुमूल्य योगदान लाभले. संस्था या सर्वांची मनापासून आभारी आहे.

मकरसंक्रांतीला तिळगुळ वाटप (२०१७)

प.पू.सद्गुरू श्रीकाका महाराज म्हणतात, दुस-याच्या चेह-यावरचा आनंद बघून जो आनंद होतो तोच खरा आनंद असतो.

प.पू श्रीकाका महाराजांच्या या शिकवणीतूनच दर वर्षी विविध वृध्दाश्रमांतून, अनाथाश्रमातून संक्रांत, दीपावली इ. सणांना , संस्थेतर्फे तिळगुळ, फराळ वितरण करून सर्वांबरोबर आनंद साजरा करण्यात येतो. या वर्षीही, म्हणजे 2017 च्या मकरसंक्रांतीला पुणे, नागपूर व मुंबई येथील विविध वृध्दाश्रमांतून, अनाथाश्रमातून तिळगुळ वाटप करण्यात आले व सर्वांसह संक्रांतीचा आनंद साजरा करण्यात आला. याशिवाय, जिथे जिथे

संस्थेतर्फे प.पू.श्रीकाका महाराजांचा सत्संग चालविण्यात येतो तिथेही तिळगुळ वाटप करण्यात आले.