वारक-यांसाठी
मोफत आरोग्य तपासण शिबिर,
श्री जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या समाधी मंदिर देहु
(२०-१०-२०१८)
'मानवसेवा हीच ईश्वरसेवा' हे श्रीसद्गुरूंचे ब्रीदवाक्य स्मरून
दिनांक २० ऑक्टोबर १८ रोजी श्रीसद्गुरुंच्या आशीर्वादाने प.पू.सद्गुरुनाथ
श्रीकाका महाराज(श्री श्रीपाद अनंत वैद्य ) सेवा परिवारातर्फे पुण्यातील
देहू येथे वारकाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर सकाळी १० वाजता सुरू
झाले. शिबीरामध्ये एकुण २९० वारकऱ्यांची तपासणी करून औषधे देण्यात आली..या
शिबिरासाठी डॉ.सौ.सिमा शिंदे आणि डॉ.श्री लक्ष्मण राऊत आणि डॉ.श्री सुधीर
सराफ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
मोफत आरोग्य तपासणी शिबिर, विठ्ठल मंदिर, अचानक चौक,
वारजे (१४-१०-२०१८)
मानवसेवा हीच ईश्वरसेवा या ब्रीदवाक्याला अनुसरून प.पू.सद्गुरूनाथ श्रीकाका
महाराज सेवा परिवाराच्या वतीने, दि. १४-१०-२०१८ रोजी , विठ्ठल मंदिर, अचानक
चौक, राम नगर, पूणे येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरास उत्तम प्रतिसाद मिळाला.
सकाळी १० वाजल्यापासून शिबिराला सुरुवात झाली. सुमारे २०० लोकांनी या सेवेचा
लाभ घेतला. शिबिरार्थींना, अमृतधारा भाग १ पपुस्तकाचे वाटपही करण्यात आले.
सेवा परीवार डॅा. अश्विनी बूधे यांचे संस्था मनापासून आभार मानते.
मोफत आरोग्य तपासणी
वसतिगृहातमाले
(०२-०९-२०१८)
प.पु. सदगुरुनाथ श्री काका महाराज यांच्या कृपेने दि.२/९/१८ रोजी माले
येथिल मुलींच्या वसतिगृहात आरोग्य शिबीर घेण्यात आले.त्यात १०-१५ वयोगटातील
६५ मुलामुलींची आरोग्य तपासणी करून औषधे देण्यात आली.या शिबीरासाठी
डॉ.सौ.सिमा शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.यावेळी संस्थेच्या वतीने श्री
भालचंद्र राऊत,सौ.महाजन काकु उपस्थित होते.श्री रामभाऊ खेडीकर , राहुल बुंधे,
गणेश क्षिरसागर, श्री शिवडेकर, गौरव खेडीकर उपस्थित होते.
प.पु. सदगुरुनाथ श्री काका महाराज यांच्या कृपेने बिबवेवाडी येथिल शाळेत
आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर दिवस.८/७/१८
रोजी घेण्यात आले.त्यात ८०० वारकऱ्यांची तपासणी करून औषधे देण्यात आले.यात
या शिबीरासाठी डॉ.सौ.सिमा शिंदे, डॉ.सौ.निता नाईक, डॉ रविंद्र देशमुख,
डॉ.जितेंद्र जाधव, डॉ कळसकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
मोफत आरोग्य तपासणी
श्री जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या समाधी मंदिर देहु
(११-०५-२०१८)
प.पु. सदगुरुनाथ श्री काका महाराज यांच्या कृपेने श्री क्षेत्र देहु येथिल
श्री जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या समाधी मंदिराच्या आवारात एकादशी
निमित्त मोफत वैद्यकीय आरोग्य शिबिर दि. ११/०५/२०१८ रोजी घेण्यात आले.यात
२५० वारकर्यांची तपासणी करून औषधे देण्यात आली. या शिबिरासाठी डॉ.प्रल्हाद
शिंदे यांचे महत्त्वाचे योगदान लाभले.
मोफत आरोग्य तपासणी
स्वानंद प्राथमिक विद्यालय व
हायस्कुल धायरी
(१६-०३-२०१८)
दि. १६/०३/२०१८ प. पु. सद्गुरूंनाथ श्री काकामहाराज यांच्या कृपने स्वयंसेवी
सहकार्य संस्थेचे स्वानंद प्राथमिक विद्यालय व हायस्कुल धायरी येथे इयत्ता
पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांचे आरोग्य शिबीर घेण्यात आले.यावेळी ३८०
विद्यार्थ्यांची शारिरीक तपासणी करून त्यांना शारिरीक स्वछ्तेचे महत्त्व
सांगण्यात आले.या शिबीरामध्ये डॉ. आदिनाथ बन ,डॉ. विपुल तनपुरे यांचे विशेष
सहकार्य लाभले.यावेळी शाळेच्या मुख्यध्यपिका सौ. श्रुती प्रशांत मनोरे
शिक्षक वर्ग व सेवा परिवाराचे सदस्य उपस्थित होते.
मोफत आरोग्य तपासणी
लोटस बाल मंदिर, धायरी
(०७-०३-२०१८)
दि.
०७/०३/२०१८ रोजी प. पु. सद्गुरूनाथ श्री काकामहाराज यांच्या कृपेने सौ.
कुंदाताई कुलकर्णी यांच्या लोटस बाल मंदिर,धायरी येथिल शाळेत मुलांचे व
त्यांच्या पालकांचे आरोग्य शिबीर घेण्यात आले. यात ४-८ वयोगटातील मुलांची
तपासणी करण्यात आली.तसेच पालकांची तपासणी करून औषधे देण्यात आली व त्यांना
मुलांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले..या
शिबिरासाठी डॉ. सौ सिमा प्रल्हाद शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या
प्रसंगी माननीय श्री. चंद्रशेखर (दादा) पोकळे उपस्थित होते. सेवा परिवाराचे
सदस्य उपस्थित होते.
मोफत आरोग्य तपासणी, माण (११-०२-२०१८)
दि.११/२/१८ रोजीआपल्या संस्थेच्या विश्वस्त सदस्य सौ.मोहिते काकू यांच्या
माण या गावी आपल्या संस्थेतर्फे सर्वसाधारण आरोग्य तपासणी व नेत्र चिकित्सा
शिबीराचेआयोजन करण्यात आले.यावेळी डॉ सौ.सिमा शिंदे,नेत्रचिकित्सक
डॉ.कुळकर्णी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.या शिबीरामध्ये पाच जणांची
शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली.एकुण १६५ स्त्रीपुरुष व बालकांची तपासणी
करून औषधे देण्यात आली.
मोफत आरोग्य तपासणी व रक्त्दान शिबिर नागपूर (२८-०१-२०१८)
संस्थेच्या नागपूर शाखेच्या कार्यात सक्रीय सहभागी असणारे, आणि संस्थेच्या
कार्यात बहुमोल योगदान देणारे कै.श्री.हिवसे काका यांच्या
स्म्रुतीप्रित्यर्थ संस्थेनी नागपूर येथे आरोग्य तपासणी शिबिरांचं आयोजन
केलं.
दि. २८ जानेवारी २०१८ या दिवशी एका मोठ्या आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन
संस्थेनी केलं. या शिबिरात सर्वसाधारण आरोग्य तपासणी, रक्तातील साखर तपासणी,
दंतचिकित्सा, नेत्र तपासणी इत्यादी विविध तपासण्या मोफत करण्यात आल्या. ३००
जणांनी या तपासण्यांचा लाभ घेतला. याशिवाय, Central Point Hospital, Nagpur
च्या सौजन्याने, मोफत ECG तपासणि करण्यात आली.
या शिबिरासाठी सर्वांचं मोलाचं सहकार्य लाभलं. संस्था या सर्वांची
मनःपूर्वक आभारी आहे.
मानवसेवा हीच ईश्वरसेवा या ब्रीदवाक्याला अनुसरून प.पू.सद्गुरूनाथ श्रीकाका
महाराज सेवा परिवाराच्या वतीने, दि. १३.०१.२०१८ रोजी , विंझाई हायस्कूल ,
ताम्हिणी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा
स्थानिक तसेच शाळेतील मूलानी लाभ घेतला.
सकाळी १० वाजल्यापासून शिबिराला सुरुवात झाली. सुमारे १०० लोकांनी या सेवेचा
लाभ घेतला. डॅा. अश्विनी बूधे व श्री. प्रहलाद शिंदे यांचे संस्था मनापासून
आभार मानते.
मकरसंक्रांतीला तिळगुळ वाटप (२०१८)
प.पू.सद्गुरू श्रीकाका महाराज म्हणतात, दुस-याच्या चेह-यावरचा आनंद बघून जो
आनंद होतो तोच खरा आनंद असतो.
प.पू श्रीकाका महाराजांच्या या शिकवणीतूनच दर वर्षी विविध वृध्दाश्रमांतून,
अनाथाश्रमातून संक्रांत सणां निमीत्य, संस्थेतर्फे तिळगुळ, वितरण करून
सर्वांबरोबर आनंद साजरा करण्यात येतो. या वर्षीही, म्हणजे २०१८ च्या
मकरसंक्रांतीला पुणे, चापडी, फणसराई, नागपूर व मुंबई इ. विविध
वृध्दाश्रमांतून, अनाथाश्रमातून तिळगुळ वाटपा सोबत धान्य, सायकली,
दिन-दर्शीका ई. वस्तूंचे वितरण करण्यात आले व सर्वांसह संक्रांतीचा आनंद
साजरा करण्यात आला. याशिवाय, जिथे जिथे संस्थेतर्फे प.पू.श्रीकाका
महाराजांचा सत्संग चालविण्यात येतो तिथेही तिळगुळ वाटप करण्यात आले.
मोफत
आरोग्य
तपासणी
शिबिर बालसदन
नागपूर
(३१-१२-२०१७)
'दि. ३१.१२.२०१७ रोजी, बालसदन नागपूर येथे आरोग्य तपासणि
शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शाळेत २० विद्यार्थी, तसेच स्टाफ यांनी या
शिबीराचा लाभ घेतला. संस्थेने घेतलेले शिबीर फारच उपयोगी ठरले. दर ३
महिन्यांनी शिबीर घेण्याचा संस्थेचा नीर्धार आहे.
या शिबिरासाठी डॉ. हर्षा वैद्य यांचे बहुमूल्य योगदान लाभले. संस्था
या सर्वांची मनापासून आभारी आहे.